Here are 3 essential care tools for curly hair 
लाइफस्टाइल

कर्ली हेयर्ससाठी आवश्यक आहेत या ३ केयर टूल्स

सुस्मिता वडतिले

पुणे : काही मुलींना कर्ली केस आवडतात तर काही जणांना मुळीच आवडत नाहीत. तुमच्याकडे योग्य साधने असल्यास कर्ली हेयर सेट करणे सोपे होऊन जाते. आणि जर हेअर सेट नसेल तर तेच काम एक आव्हान बनते. तसेच आपण आपले कर्ल काळजीपूर्वक सेट न केल्यास आपण त्या केसांच्या आरोग्यासह खेळत राहू. स्टाईलिंग कर्ली केसांना कोणत्याही फ्रिज़शिवाय कर्लची टेक्स्चर, वॉल्यूम आणि हायड्रेशन राखण्यासाठी बरेच प्रयत्न आणि स्मार्टनेस आवश्यक असते. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी, आम्ही तुम्हाला तीन महत्त्वपूर्ण हेल्दी हेयर टूल्स ठेवण्याचा सल्ला देत आहोत जे तुम्हाला केसांची निगा राखण्यास नियमित मदत करतील.

वॉटर स्प्रे

वॉटर स्प्रेची बाटली जी हेयर स्टाइलिस्ट करताना सर्व हेअरस्टायलिस्ट वापरतात. आपल्याकडे एक उत्तम स्टाईलिंग नैचुरल कर्ल्स देखील असावी. आपल्या सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहे की कर्ल अधिक ओले आणि छान दिसतात. जेव्हा केस ओले असताना स्टाईल करता येतात. चांगले स्टाईल केलेले कर्ल मिळविण्यासाठी, केस वॉश केल्यानंतर जेव्हा केस ओले असतात त्यावेळी स्टाईलिंग क्रीम आणि केयर प्रॉडक्ट्स लावा. जर तुमचे केस खूपच ओले झाले असतील आणि आपल्या केसात ओलावा कमी पडत असेल तर सुरुवातीला आपले केस चांगले ओले करण्यासाठी वॉटर स्प्रे बाटली वापरा आणि नंतर स्टाईलिंग केयर प्रॉडक्ट्स लावा. 

वेट डिटॅंगलिंग ब्रश

या ब्रशमध्ये खूप सॉफ़्ट ब्रिस्टल्स आहेत, ज्या ओल्या केसांसाठी डिझाइन केलेले आहेत. तर हे ब्रशेस कुरळे केसांसाठी फायदेशीर आहेत. नेहमी केस ओले असताना कुरळे केसांना कंगवा करणे चांगले मानले जाते आणि यानुसार हे ब्रश परफ़ेक्ट आहे.

मायक्रोफायबर टॉवेल

हे मायक्रोफायबर टॉवेल्स मऊ फॅब्रिकचे बनलेले आहेत, जे केसांना कमी घासतात आणि शॉवर घेतल्यानंतर केस मऊ होण्यास मदत करतात, ज्यामुळे फ्रिजनेसवर नियंत्रण ठेवता येते. हे टॉवेल्स केसांना तोडणे आणि कोरडे होण्यापासून देखील संरक्षण करतात. कुरळे केस असलेल्या महिलांना अशा टॉवेल्सच्या वापरामुळे बराच फायदा होतो. ते नियंत्रण वैशिष्ट्य आणि कोमलता कुरळे केस काळजी घेण्यासाठी अधिक चांगली निवड करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT