Holi 2024
Holi 2024 esakal
लाइफस्टाइल

Holi 2024 : होळीच्या उत्साहात मुलांच्या आरोग्याकडे करू नका दुर्लक्ष, अशा पद्धतीने घ्या काळजी

Monika Lonkar –Kumbhar

Holi 2024 : आज देशातील सर्वच राज्यांमध्ये होळीचा उत्साह पहायला मिळत आहे. २४ मार्चला होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात आज रंगांची होळी खेळली जाते. या होळीच्या काही राज्यांमध्ये अनोख्या परंपरा पहायला मिळतात. काही ठिकाणी लठ्मार होळी, राखेची होळी तर काही ठिकाणी फुलांचा आणि रंगांचा वापर करून खेळली जाणारी होळी साजरी केली जाते.

या रंगाच्या उत्सवादरम्यान तरूणाईसोबतच लहान मुलांची देखील रंग खेळण्याची लगबग सुरू असते. परंतु, या काळात लहान मुलांच्या आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे. या होळीचा मुलांमध्ये भलताच उत्साह असतो. परंतु, कधीकधी होळीच्या दरम्यान, पालकांचे लहान मुलांकडे दुर्लक्ष होते.

केमिकलयुक्त रंगांचा अधिक वापर केल्याने किंवा इतर काही कारणांमुळे मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे, होळीच्या वेळी मुलांच्या आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे. त्या संदर्भातल्या काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रासायनिक रंगांपासून करा बचाव

आजकाल मार्केटमध्ये नैसर्गिक रंगांसोबत केमिकलयुक्त रंगांचे प्रमाण ही वाढले आहे. शिवाय, अनेकदा नैसर्गिक रंग आणि केमिकलयुक्त रंगांची निवड करण्यात लोक संभ्रमात पडतात. या अशा भेसळयुक्त रासायनिक रंगांमुळे त्वचेचे आणि आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते.

त्यामुळे, रासायनिक रंगांचा वापर करणे टाळा आणि मुलांसाठी नैसर्गिक रंग आणा. जेणेकरून मुलांच्या आरोग्याचे संरक्षण होऊ शकेल. शिवाय, रंग खेळताना मुलांच्या डोळ्यांना गॉगल लावा. जेणेकरून डोळ्यांची काळजी घेतली जाईल. तसेच, फुल बाह्यांचे सूती कपडे मुलांना घालायला द्या. त्यामुळे, त्वचेचे संरक्षण होईल.

खाण्यापिण्याची घ्या काळजी

होळी म्हटलं की विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, गोड पदार्थ, थंडाई, तळलेले पदार्थ हे सगळ आलंच. परंतु, या खाद्यपदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे मुलांचे पोट बिघडू शकते. पचनक्षमतेच्या ही समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय, या खाद्यपदार्थांमधून विषबाधा होण्याचा ही धोका असतो. त्यामुळे, या होळीच्या उत्साहात लहान मुलांची तब्येत बिघडू नये, म्हणून मुलांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT