Holi 2024 esakal
लाइफस्टाइल

Holi 2024 : होळीसाठी रंग खरेदी करताय? मग, 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

Holi 2024 : होळीच्या निमित्ताने विविध रंगांची खरेदी केली जाते. हे रंग खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Holi 2024 : भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. उद्या देशात सर्वत्र होळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार आहे. त्यामुळे, बाजारात होळीच्या साहित्याची, विविध रंगांची, रेलचेल पहायला मिळत आहे. यंदा २४ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. रविवारी होलिका दहन आणि सोमवारी २५ मार्चला धूलिवंदन साजरे केले जाणार आहे. धूलिवंदनाच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि धूलिवंदनाच्या शुभेच्छा देतात.

होळीच्या निमित्ताने विविध रंगांची खरेदी केली जाते. बाजारात विविध प्रकारचे रंग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकारींनी बाजारपेठ सजलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे, या गोष्टी खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. परंतु, होळीचे हे रंग खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

नैसर्गिक रंगांची अशी करा ओळख

होळीच्या निमित्ताने विविध प्रकारचे रंग खरेदी करण्यापूर्वी असली आणि नकली रंगांची तपासणी अवश्य करून घ्या. शक्यतो नैसर्गिक रंग खरेदी करण्यावर भर द्या. केमिकल्सने युक्त असलेले रंग खरेदी करू नका. कारण, या रंगांमुळे त्वचेचे आणि केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

नैसर्गिक रंग आणि केमिकलयुक्त रंगांमध्ये ओळख पटवणे कठीण होऊन बसते. अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे नैसर्गिक रंगांना चमक कमी असते. याउलट केमिकलयुक्त रंगांना चमक जास्त असते. ज्यामुळे, ते अधिक चकचकीत दिसतात. परंतु, तुम्ही याला बळी पडू नका आणि नैसर्गिक रंग खरेदी करा.

रंग विकत घेताना त्यांना स्पर्श करून पाहा. अनेकदा काच बारीक करून ती रंगांमध्ये मिसळली जाते. जेणेकरून रंग चमकदार दिसावेत. परंतु, असे रंग आपल्या त्वचेला हानी पोहचवू शकतात. त्यामुळे, रंग खरेदी करताना योग्य ती खबरदारी घ्या.

पॅकेजिंगवर द्या लक्ष

जर तुम्ही होळीसाठी रंग खरेदी करणार असाल, तर सर्वात आधी रंगांच्या पॅकेटचे पॅकेजिंग अवश्य तपासून पाहा. या पॅकेजिंगमध्ये त्यात असणाऱ्या घटकांचे तपशील दिलेले असतात. ते काळजीपूर्वक वाचा. जर या घटकांमध्ये गुलाब, हळद यांसारखे घटक रंग बनवण्यासाठी वापरले गेले असतील तर समजून घ्या की, हे नैसर्गिक रंग आहेत. जर या घटकांमध्ये केमिकल्सचा वापर करण्यात आला असेल तर, असे रंग अजिबात खरेदी करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France protests: नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्सही पेटलं! रस्त्यावर सुरू झाली जोरदार निदर्शनं अन् जाळपोळ

Uttar Pradesh : नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर CM योगी ऍक्शन मोडवर;पोलिसांना दिले आदेश

Yogi Adityanath: ''गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना सोडणार नाही'' जनता दरबारात मुख्यमंत्री आदित्यनाथ कडाडले

Horoscope 2025 : पितृपक्ष ठरणार 'या' 3 राशींना LUCKY ! भद्र महापुरुष योगामुळे होणार पैशांची बरसात

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुरग्रस्तांना मोठा दिलासा; ४८ मदतवाहनांना दिला हिरवा झेंडा, १० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT