Holi 2024 esakal
लाइफस्टाइल

Holi 2024 : 'हर रंग कुछ कहता है', होळीच्या निमित्ताने जाणून घ्या विविध रंगांचे महत्व

Holi 2024 : रंगांचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा होळी हा आनंदाचा सण आहे. हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Holi 2024 : रंगांचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा होळी हा आनंदाचा सण आहे. हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे, या सणाला भारतात विशेष असे महत्व आहे. दसरा आणि दिवाळीप्रमाणे हा सण देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतिक म्हणून हा सण साजरा केला जातो. होळी हा सौहार्द आणि  प्रेमाचा सण मानला जातो. यंदा २४ आणि २५ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. २४ मार्चला होलिका दहन आणि २५ मार्चला रंगांची उधळण केली जाणार आहे. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात.

परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की, होळीच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या विविध रंगांचे खास असे महत्व आहे. यातील प्रत्येक रंगाला धार्मिक आणि वैज्ञानिक असे महत्व आहे. होळीच्या निमित्ताने आज आपण विविध रंगांचे महत्व जाणून घेणार आहोत.

लाल रंग

होळीच्या दिवशी लाल रंगाचा सर्वाधिक वापर केला जातो. हा लाल रंग ऊर्जा, प्रेम, उत्साह आणि विजयाचे प्रतिक मानला जातो. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला होळीच्या दिवशी हा लाल रंग लावू शकता. हा लाल रंग तुम्ही लावल्याने तुमचे त्या व्यक्तीबद्दलचे प्रेम आणि भावना सहजपणे व्यक्त करू शकाल. होळीच्या दिवशी या प्रेमाच्या रंगाची उधळण जरूर करा.

नीळा रंग

भगवान श्रीकृष्ण यांचे रूप निलांबर आहे. त्यामुळे, होळीच्या दिवशी या निळ्या रंगाचे खास असे महत्व आहे. हा निळा रंग विश्वास,शक्ती आणि प्रेम यांचे प्रतिक आहे. आकाशाच रंग देखील निळा आहे. तुम्ही होळीच्या दिवशी या निळ्या रंगाची होळी खेळू शकता. शिवाय, हा निळा रंग अनेकांना आवडतो.

पिवळा रंग

भारतीय संस्कृतीमध्ये या पिवळ्या रंगाला विशेष असे महत्व आहे. कारण, भारतातील प्रत्येक शुभ कार्याची सुरूवात ही पिवळ्या रंगाने केली जाते. शिवाय, हा पिवळा रंग शांती, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतिक आहे.

गुलाबी रंग

होळीच्या दिवशी या गुलाबी रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा गुलाबी रंग दयाळूपणा, मैत्री आणि इतरांची काळजी घेण्याचे प्रतिक मानले जाते. होळीला या गुलाबी रंगाचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करतात. यासोबतच हिरवा, जांभळा, केशरी इत्यादी रंगांचा ही वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT