Holi 2024 esakal
लाइफस्टाइल

Holi 2024 : होळीला तुमच्या राशीनुसार उधळा रंग, आयुष्यातील अनेक अडचणी घेतील EXIT

सिंह राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी सकाळी करावा एक उपाय

सकाळ डिजिटल टीम

Holi 2024 : 

होळीसारखा महत्त्वाचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. होळीला होलिका दहन आणि धुळवड जोरात साजरी केली जाते. होळीदिवशी सायंकाळी होळीचे पूजन करून पेटवली जाते. तर दुसऱ्या दिवशी रंगोत्सव खेळला जातो. होळीदिवशी तुम्ही सगळेच रंग घेऊन एकमेकांच्या पाठी पळत सुटाल.

पण थांबा, आम्ही आज तुम्हाला एक कामाची बातमी सांगणार आहोत. तसे तर सगळेच रंग सुंदर असतात. पण रंगांच्या बाबतीत खास गोष्टी पाळल्या तर तुम्हाला येणारं वर्ष सुखात जाईल. ज्योतिषशास्त्राच्या मते, रंग लावताना एखादा विशिष्ट रंग तुम्ही वापरला तर ते तुमच्यासाठी चांगले ठरेल.

रंग आपल्या आयुष्यात महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळेच एखाद्या शुभ कार्याला जाताना शुभ रंगांची कपडे घातली जातात. किंवा लकी असलेले रंगाचेच कपडे घालतात. त्यामुळे या रंगांच्या सणाला तुम्ही राशीनुसार रंग लावले तर ते तुमच्या सकारात्मक प्रभाव पाडेल.

या होळीच्या रंगांची निवड करून तुम्ही तुमचे येणारे नवीन वर्ष सुधारू शकता. ज्योतिषी पंडित मनोहर आचार्य सांगतात की, राशीनुसार रंग निवडून तुम्ही होळीचा सण चांगला बनवू शकता. ते म्हणाले की लोकांनी त्यांच्या राशीनुसार रंग निवडावेत.

ज्योतिषशास्त्रानुसार,

मेष राशीच्या लोकांनी या होळीला लाल रंगाने होळी खेळणे योग्य ठरेल. त्यांनी लाल रंग वापरावा.

वृषभ - राशीसाठी होळी खेळण्यासाठी जांभळा आणि केशरी रंग शुभ आहेत.

मिथुन - राशीच्या लोकांनी होळी खेळण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर करावा. त्यांनी हिरवा रंग लावूनच होळी साजरी करावी.

कर्क - राशीच्या लोकांनी होळी खेळण्यासाठी निळ्या रंगाचा वापर करावा.

सिंह - राशीच्या लोकांनी केशरी रंगाने होळी खेळावी. इतकंच नाही तर सिंह राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी सकाळी उठून त्यात गुलाबाचं फूल ठेवून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.

कन्या - या राशीच्या लोकांसाठी, होळी खेळण्यासाठी पिवळा रंग उत्तम आहे. येथे पाहा तुमच्यासाठी कोणता रंग सर्वोत्तम असेल.

तूळ - राशीच्या लोकांसाठी निळ्या आणि भगव्या रंगांनी होळी खेळणे योग्य ठरेल.

वृश्चिक - या राशीचे लोक होळी खेळण्यासाठी कोणताही रंग निवडू शकतात. मात्र, त्यांना हवे असल्यास ते होळी खेळण्यासाठी जांभळा रंगही वापरू शकतात.

धनु - राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाने होळी खेळणे चांगले.

मकर - राशीच्या लोकांसाठी लाल आणि जांभळा रंग

कुंभ राशीच्या लोकांसाठी हिरवा आणि पांढरा

मीन - राशीच्या लोकांसाठी गुलाबी रंगाने होळी खेळणे उत्तम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT