Holi Party 2024 esakal
लाइफस्टाइल

Holi Party 2024 : रंग लावण्याऐवजी सगळे तुम्हाला पाहून हरवून जातील, होळीच्या पार्टीला फक्त ‘या’ अभिनेत्रींसारखा करा हटके लूक

Holi Party 2024 : आपल्या देशात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. आता अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Holi Party 2024 : आपल्या देशात होळीचा (Holi 2024) सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. आता अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. २४ मार्चला होलिका दहन आणि २५ मार्चला रंगांची होळी साजरी केली जाणार आहे. होळीच्या निमित्ताने पार्टीचे नियोजन केले जाते. या पार्टीला जाण्यासाठी तरूणींची जय्यत तयारी सुरू असते.

जर तुम्हाला ही यंदा होळीच्या पार्टीला जायचे असेल आणि तुम्हाला पार्टीत सर्वात हटके दिसायचे असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला होळीनिमित्त स्टायलिश आणि हटके लूक करण्यासाठी काही टिप्स देणार आहोत. या टिप्स आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्रींच्या गाजलेल्या लूक्सवरून देणार आहोत. (Holi Party 2024)

तमन्ना भाटिया

दाक्षिणात्य आणि बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या प्रत्येक लूकमधून चाहत्यांचे मन जिंकून घेताना दिसते. तिचा पारंपारिक लूक असुद्या किंवा मॉर्डन लूक असुद्या. ती प्रत्येक लूकमध्ये तितकीच सुंदर दिसते. होळीच्या पार्टीसाठी तुम्ही तमन्नाच्या या लूकपासून प्रेरणा घेऊ शकता.

होळीच्या पार्टीला तुम्ही तिच्याप्रमाणे हा व्हाईट सलवार सूट परिधान करू शकता. या व्हाईट सलवार सूटवर तुम्ही कोणत्याही डार्क रंगाचा दुपट्टा मॅचिंग करू शकता. मोकळे केस आणि कानात झुमके किंवा चाँदबाली तुम्ही कॅरी करू शकता. तुमचा होळी स्पेशल लूक तयार आहे. (Tamanna Bhatia)

संजना सांघी

‘दिल बेचारा’ फेम अभिनेत्री संजना सांघी तिच्या पारंपारिक आणि मॉर्डन लूकसाठी खास करून ओळखली जाते. तिच्या या लूकपासून तुम्ही होळी पार्टीसाठी प्रेरणा घेऊ शकता.

अनेक तरूणींना होळीला कम्फर्टेबल लूक करायला आवडतो. संजनाचा हा लूक त्यासाठी एकदम बेस्ट आहे. संजनाप्रमाणे पांढऱ्या रंगाची कॉटन पॅंट आणि शर्ट तुम्ही परिधान करू शकता. त्यावर तुम्ही हव्या त्या डार्क रंगाचा दुपट्टा ही घेऊ शकता. तसेच, कानात हेव्ही झुमके आणि डोळ्यांवर काळा गॉगल घालून तुमचा लूक पूर्ण करू शकता. (Sanjana Sanghi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT