Holi 2024  esakal
लाइफस्टाइल

Holi 2024 : होळीचा सण लय भारी! यंदाच्या वर्षी होळीवर आहे चंद्र ग्रहणाचे सावट?

चंद्र ग्रहण भारतातून दिसेल की नाही?

सकाळ डिजिटल टीम

Holi 2024 :

भारतीय संस्कृतीत अनेक सण आहेत जे आपल्याला छोटे मोठे आनंद देऊन जातात. यातही काही स्पेशल सण आहेत ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळी दसरा आहेच पण त्यासोबतच होळीचीही सगळे वाट पाहत असतात.

 नव्या वर्षातला मोठा सण म्हणून होळीला ओळखले जाते. होळी दिवशी राक्षसी होलिकेचे दहन केले जाते. अन् दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यंदाच्या वर्षी होळीवर चंद्र ग्रहणाचंही सावट आहे असे सांगितले जाते. तसेच होळीची तारीख अन् होलिका दहन करण्याची योग्य वेळ कोणती ते पाहुयात. (Holi 2024 Muhurta)

होळी कधी आहे

दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. 2024 मध्ये होळी 25 मार्च रोजी खेळली जाईल. त्यांच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाईल. 24 मार्च रोजी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 11:13 ते 12:07 पर्यंत असेल.

चंद्र ग्रहणाचे सावट?

25 मार्च 2024 रोजी पहिले चंद्रग्रहण होणार आहे. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होत असते. 25 मार्च 2024 रोजी हे चंद्रग्रहण सकाळी 10:41 वाजता सुरू होईल आणि सुमारे 3:01 वाजता समाप्त होईल.  (Lunar Eclipse 2024)

भारतात दिसेल का चंद्र ग्रहण?

हे चंद्रग्रहण आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम, दक्षिण नॉर्वे, स्वित्झर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, जपान, रशियाचा पूर्व भाग आणि आफ्रिकेमध्येही दिसणार आहे. पण ते भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याच्या भारतीय सण होळीवर काहीही परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे पुतळे नव्हेत तर स्मरण, भिडे गुरुजींसारखे गुरुजी छत्रपतींचा इतिहास तरुणांमध्ये रुजवतायत : मुख्यमंत्री फडणवीस

Pune Traffic News : आरबीआय मेट्रो स्थानकाजवळ अपघात; वाहतूक कोंडीमुळे एक मार्गिका बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Latest Marathi News Live Update : मुंढवा जमीन प्रकरणात आरोपी शितल तेजवानीच्या जामीन अर्जावर सुनावणी

Kolhapur Municipal Corporation : अर्धशतकानंतरही विकास खुंटलेला; संकटांच्या चक्रव्यूहात अडकलेली कोल्हापूर महापालिका

New Year 2026 Trip Idea: नवीन वर्षाची सुरूवात करा हटके पद्धतीने! गर्दीपासून दूर असलेली भारतातील ‘ही’ ठिकाणे एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT