Holi Eye Care Sakal
लाइफस्टाइल

Holi Eye Care: होळीचा रंग डोळ्यात गेल्यास लगेच करू नका 'हे' काम

Holi Eye Care: होळीच्या रंगापासून डोळ्यांचे रंक्षण करायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

सकाळ डिजिटल टीम

How to protect eyes from holi colors

रंगांचा सण म्हणजे होळी यंदा 25 मार्चला साजरा केला जाणार आहे. अनेक ठिकाणी रंग खेळण्यास सुरुवात झाली आहे. होळी हा एक असा सण आहे, ज्यामध्ये लोक मोठ्या आनंदाने सहभागी होतात. रंगांशी खेळण्यात खूप मज्जा येते, पण यादरम्यान त्वचा, केसांची काळजी घेणे गरजेचे असते.

बाजारात मिळणाऱ्या अनेक रंगांमध्ये रसायने असतात. म्हणूनच, लोक त्यांच्या त्वचेबद्दल आणि केसांबद्दल खूप जागरूक असतात. पण डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. असे रासायनिक रंग डोळ्यात गेल्यास इजा होऊ शकते. यामुळे डोळ्यात रंग गेल्यास काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया.

  • डोळे चोळणे टाळा

डोळ्यात कोणतीही गोष्ट गेल्यास लगेच डोळ्यात खाज किंवा जळजळ सुरू होते. अनेक लोक डोळ्यांमध्ये रंग गेल्यास डोळे चोळतात, पण असे करू नका. कारण यामुळे रंग आणखी डोळ्यात जाऊ शकतो. ज्याचा तुमच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. डोळे चोळल्यास लाल होऊन त्यावर सुज येऊ शकते.

  • काकडीचा वापर

डोळ्यांची जळजळ आणि थकवा दूर करण्यासाठी काकडीचा वापर करू शकता. काकडीचे पातळ काप करून फ्रीजरमध्ये ठेवावे. नंतर काकडीचे काप बाहेर काढून डोळ्यांवर 10 ते 15 मिनिटं ठेवावे. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल.

  • बर्फ

डोळ्यांची होणारी जळजळ कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करू शकता. यासाठी बर्फाचा तुकडा घेऊन तो सुती कापडामध्ये ठेऊन डोळ्यांना लावावा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.

  • गुलाब जल

अनेक रंग हे केमिकलयुक्त असतात. असे रंग डोळ्यात गेल्यास गुलाब जलमध्ये कापुस भिजवून डोळ्यांवर ठेऊ शकता. याशिवाय तुम्ही आय ड्रॉप देखील वापरू शकता. पण कोणताही आयड्रॉप टाकण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • थंड पाणी

जर होळीचे रंग चुकून डोळ्यात गेल्यास सर्वात पहिले टिश्यू पेपर किंवा मुलायम कापडाने डोळ्यांभोवतीचा रंग पुसून घ्यावा. यानंतर डोळे लगेच थंड पाण्याने धुवावेत. 15 ते 20 वेळा डोळ्यांवर थंड पाणी शिंपडावे. यामुळे डोळ्यातून रंग निघून जाईल. वरील उपाय करून देखील डोळ्यांना त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaista Tadvi Success Story : अठरा विश्व दारिद्र्य अन् उपासमारीची वेळ, तरीही जिद्द सोडली नाही! वीटभट्टी कामगाराच्या लेकीनं पहिल्याच प्रयत्नात पोलिस होऊन दाखवलं

गुरुजी हे वागणं बरं नव्हं! काजूच्या बागेत महिलेवर शिक्षकाचा अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Latest Marathi News Live Update : कामाचे वातावरण 'विषारी' झाले तरी कर्मचारी नोटीस कालावधी पूर्ण करतात, भारद्वाज यांचे राघव चढ्ढा यांना प्रत्युत्तर

Sagareshwar Wildlife Sanctuary : सांगलीच्या 'सागरेश्वर'मध्ये वन्यजीवांचा मुक्त संचार! उन्हाळ्यातही हरणांचे कळप पाहायचेत? मग, हीच आहे सुवर्णसंधी

Maharashtra HSC Result 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 'या' दिवशी निकाल लागण्याची शक्यता, अपडेट्स समोर

SCROLL FOR NEXT