Holiday Sakal
लाइफस्टाइल

गिल्ट न बाळगता ख्रिसमस, नवीन वर्षांचा आनंद लुटा बिनधास्त ... या टिप्स फॉलो करा

या काळात आरोग्य आणि फिटनेसकडे दुर्लक्ष होईल अशी भिती काही लोकांना असते

सकाळ डिजिटल टीम

सुट्टीच्या काळात अनेकजण आराम करण्यासाठी, मित्र-कुटूंबासोबत चिल करण्यासाठी आणि काही चांगले पदार्थ (Food) करण्यासाठी उत्सुक असतात पण आरोग्य आणि फिटनेसकडे (Health) दुर्लक्ष होईल अशी भिती काही लोकांना असते. सुट्टीत (Holiday) कोणताही गिल्ट न बाळगता त्याचा आनंद लुटायचा असेल तर काही टिप्स आहारतज्ज्ञ अनुपमा मेनन यांनी सांगितल्या आहेत.

food

स्मार्ट फूड चॉईस करा-

सणाच्या काळात अनेकांचा चविष्ट खाद्यपदार्थ खाण्यावर भर असतो. अशावेळी कॅलरीचा विचार बाजूला पडतो. पण या गोष्टींना बळी पडू नका, त्यासाठी अनुपमा सांगतात की, या काळात एखाद्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी एक तास आधी नाश्ता करा आणि कोणते पदार्थ कोणते पदार्थ उपलब्ध आहेत हे पाहण्यासाठी स्वतःला वेळ द्या. तुम्हाला काय हवे आहे यावर निवड करा. प्रत्येक वेळी तुम्ही भरपूर भाज्या खाल याकडे लक्ष द्या.

Drinking Water

हायड्रेटेड राहा-

हायड्रेशनच्या अभावामुळे तुम्हाला खूप भूक लागू शकते. किंवा थकल्यासारखे वाटू शकते. अशावेळी स्नॅक्स खाण्याआधी आधी एक ग्लास पाणी प्यावे. तसेच अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा. प्रत्येक अल्कोहोलिक पेय एका ग्लास पाण्याने बदलू शकते

sleep

पुरेशी झोप घ्या -

सणासुदीच्या काळात बदललेले वेळापत्रक, आहार आणि रात्री उशिरापर्यंत वेळ घालविल्यानंतर तुम्हाला चांगली विश्रांती घेण्याची गरज आहे. म्हणून सुट्टीच्या काळात झोपेसाठी वेळ निश्चित करा. सातत्य ही महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे प्रवास करत असतानाही तुमची नियमित झोपण्याची आणि उठण्याच्या वेळा कायम ठेवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करा़, असा सल्ला मेनन देतात.

walk

वॉक ला जा-

सुट्टीच्या काळात व्यायामासाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आङे. यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यासाठी खूप मदत मिळू शकेल. कॅलरीज बर्न करण्यासाठी फिरणे हा एक सोपा मार्ग आहे.

new year celebration

नवीन वर्षापर्यंत थांबू नका-

जर तुम्ही तुमच्या व्यायामाचे वेळापत्रक पाळायला चुकलात तर सोमवार किंवा नवीन वर्षाची वाट पाहू नका. ताबडतोब ट्रॅकवर परत या. परंतु शनिवार व रविवार तुमची बरीच कसर भरून काढू शकतो. त्यामुळे कोणतेही गिल्ट बाळगू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT