home cleaning tips Esakal
लाइफस्टाइल

Home Cleaning Tips: स्वच्छतेसाठी Bleach नको, स्वयंपाकघरातल्याच या वस्तू पहा वापरून

Home Cleaning Tips: बाजारात मिळणाऱ्या ब्लिच Bleaching उत्पादनांमध्ये बऱ्याच प्रमाणात रसायने असतात. त्यामुळे घरातील टाइल्स Tiles किंवा फर्निचर खराब होऊ शकते. त्या ऐवजी तुम्हाला तुमच्या किचनमधल्या काही वस्तू किंवा पदार्ध वापरता येऊ शकतात

सकाळ डिजिटल टीम

Home Cleaning Tips: घरात अशा काही जागा किंवा वस्तू असतात, ज्या केवळ साबणाने किंवा पावडरीने स्वच्छ करणे शक्य नसते. अशा गोष्टी स्वच्छ करण्यासाठी आपल्याला खास करून ब्लिचिंग सामग्रीची गरज लागते.  Home Cleaning Hacks Use Kitchen Products for your home cleaning instead of Bleaching

ज्या ठिकाणाची स्वच्छता Cleaning अनेक वर्षांपासून करण्यात आली नसेल अशा ठिकाणी बरीच घाण जमा होते. ती स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाकघरातीलच Kitchen काही वस्तूंचा वापर करता येऊ शकतो. बाजारात मिळणाऱ्या ब्लिच Bleaching उत्पादनांमध्ये बऱ्याच प्रमाणात रसायने असतात. त्यामुळे घरातील टाइल्स Tiles किंवा फर्निचर खराब होऊ शकते.

नाजूक वस्तूंवर ब्लिचिंगचा वापर अजिबात करू नये. कपडे Clothes स्वच्छ करायचे असतील तर त्यासाठी मिठाचा Salt वापर करून बघावा. मीठदेखील एक प्रकारचे ब्लिचिंग एजंट आहे. कपड्यांवर पडलेले गडद डाग त्याने सहजपणे स्वच्छ होतात. अशाच काही वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या तुम्हाला वापरता येतील घराच्या स्वच्छतेसाठी

सोडा-कोला : सोडादेखील आपण स्वच्छतेसाठी वापरू शकतो. कोला ड्रिंकचा वापर बाथटब, सिंक आणि टॉयलेट पॉट स्वच्छ करण्यासाठी करता येतो. या वस्तूंवर कोला ड्रिंक टाकावे आणि २०-३० मिनिटांपर्यंत तसेच ठेवावे, त्यानंतर ब्रशने घासून पाणी टाकावे. टॉयलेट स्वच्छ होते. लिंबू : जमा झालेली घाण आणि तेलाचे डाग लिंबाच्या रसामुळे सहज जातात.

हे देखिल वाचा-

व्हिनेगर : व्हिनेगरच्या मिश्रणात आपण खराब कपडे स्वच्छ करू शकतो. बाथरूमच्या टाइल्सदेखील त्याने स्वच्छ होऊ शकतात. तसेच खिडक्यांच्या खराब झालेल्या काचा याने स्वच्छ करता येतात.

ब्लिचिंग पावडर बाथरूमच्या टाइल्स अगदीच खराब झाल्या असल्यास ब्लिचिंग पावडरने साफ कराव्यात. जीन्स फेड (फिक्कट) बनवण्यासाठीदेखील अनेक जण ब्लिचिंग पावडरचा उपयोग करतात. कारण ही पावडर कपड्यांचा रंग घालवते.

बेकिंग सोडा : किचनमधील तेलकट आणि खराब झालेल्या भिंती स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो. यामुळे स्वयंपाकघरातील दुर्गंधीदेखील जाते. पांढरे कपडे धुताना बेकिंग सोडा पाण्यात मिसळावा.

मीठ : व्हिनेगर किंवा लिंबाच्या रसात मीठ एकत्र मिसळून यापासूनही चांगली स्वच्छता करता येते.

बटाटा : बटाट्यामुळे लोखंडाच्या गंजाचे डाग घालवता येतात. बटाट्यात ऑक्झॅलिक अॅसिड असते. ते गंज घालविते. काचेच्या आणि चंदेरी वस्तूंचीदेखील याने स्वच्छता होऊ शकते. चिंच चिंचेमध्ये थोडेसे मीठ टाकून स्वच्छतेसाठी उत्तम प्रकारे वापरता येते. तांब्याची, पितळेची भांडी अथवा वस्तू चिंचेने साफ होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT