home remedies benefits of drinking hot water 
लाइफस्टाइल

सर्दी-खोकलाच नाही तर, गरम पाणी प्यायल्यामुळे 'या' ६ समस्याही होतील दूर!

शर्वरी जोशी

शरीरातील प्रत्येक अवयवाचं कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी ज्याप्रमाणे अन्नाची गरज असते. तितकीच आवश्यकता पाण्याचीदेखील असते. त्यामुळे अनेकदा डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञदेखील भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. परंतु, अनेकांना कमी पाणी पिण्याची सवय असते. त्यामुळे अनेकदा शरीरातील पाण्याची पातळी खालावते आणि अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. यात अनेक जणांना बद्धकोष्ठता किंवा अन्य समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे दररोज भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. यामध्येच  काहींना फ्रिजमधील गार पाणी पिण्याचीदेखील सवय असते. खासकरुन उन्हाळ्यात अनेक जण गार पाणी पिण्यावर भर देतात. मात्र, कमी पाणी प्यायल्यामुळे ज्या पद्धतीने शारीरिक समस्या निर्माण होत असतात. तशाच काही समस्या गार पाणी प्यायल्यामुळेदेखील होतात. मात्र, ते आपल्या पटकन लक्षात येत नाही. याच्याच उलट जर गरम किंवा कोमट पाणी प्यायलं, तर त्यामुळे अनेक लहानसहान व्याधी दूर होऊ शकतात. त्यामुळे आज गरम पाणी पिण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

गरम पाणी पिण्याचे फायदे

१. सुंदर दिसण्यासाठी किंवा व्यक्तीमत्त्वात भर पडण्यासाठी स्त्रिया सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. परंतु, सातत्याने सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्यामुळे त्याचा परिणाम थेट त्वचेवर होत असतो. सततच्या सौंदर्य प्रसाधनांच्या माऱ्यामुळे त्वचा दिवसेंदिवस निस्तेज होते. म्हणूनच, दररोज गरम पाणी पिण्याने गरजेचं आहे. गरम पाणी प्यायल्यामुळे त्वचेतील तजेला वाढतो आणि निस्तेज झालेली त्वचा पुन्हा चमकते.

२. दररोज रात्री जेवण झाल्यानंतर गरम पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.

३. सकाळी अनेशापोटी कोमट पाणी प्यायल्यास शरीरामधील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

४. सर्दी किंवा खोकला झाल्यास गरम पाणी प्यावे. त्यामुळे छातीत कफ असल्यास तो सुटतो व आराम मिळतो.

५. गरम पाण्यामुळे त्वचा कायम नितळ आणि तजेलदार राहते.

६.  उचकी लागल्यास कोमट पाणी प्यावे.

७. तळलेले पदार्थ खाल्यानंतर शक्यतो गरम पाणी प्यावे त्यामुळे खोकला किंवा अन्य समस्या उद्धभवत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

SCROLL FOR NEXT