home remedies for dark and chapped lips 
लाइफस्टाइल

बदलत्या हवामानानुसार काळे होणाऱ्या आणि फुटणाऱ्या ओठांसाठी करा हे सोपे उपाय!

धनाजी सुर्वे

कोल्हापूर - बदलत्या हवामानाचा ओठांवर खूप परिणाम होतो. काहींचे ओठ फाटतात तर काहिंचे ओठ काळे पडतात. परंतु, यामुळे तुमच्या चेरहऱ्याचे साैंदर्य बदलते. चेहऱ्यापेक्षा ओठांची त्वचा जास्त नाजूक असते. त्यामुळे त्यावर लगेच परिणाम होतो. परंतु, जास्त घाबरण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला काळे ओठ आणि फाटलेले ओठ कसे नाजूक आणि सुंदर करता येतील हे सांगणार आहोत.  

 गुलाबी ओठांसाठी सर्वोत्कृष्ट लिप पॅक
एक किंवा दोन चमचे हळद पावडर
एक छोटा चमचा पुदिन्याचा रस
 थोडे ग्लिसरीन
 
या तीन्ही वस्तू मिळून तुम्हाला एक चांगले मिश्रण तयार करायचे आहे आणि ते तुमच्या फाटलेल्या ओठांवर लिप पॅक लावता तसे लावायचे आहे. हे मिश्रण करताना शक्यतो बिना केमिकलच्या हळदीचा वापर करा. जर तुमच्या ओठांवर काळेपणा असेल तर तुम्ही हे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा. हे मिश्रण लावल्यानंतर वीस मिनिठांनी ते थंड पाण्याने स्वच्छ धुवा. महत्वाची गोष्ट म्हणजे हे करत असताना ओठांना खूप नाजूक हातांनी हाताळा म्हणजे ओठ खराब होणार नाहीत.  
 
ओठांच्या रक्ताभिसरमासाठी मसाज तेल 

बदामाच्या तेलाचे काही थेंब, एक चमचा शुद्ध मोरहीचे तेल एकत मिसळा आणि त्याच एक चमचा कोरपडीचे जेल घाला. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा. या तेलाचा रोज झोपताना मसाज करा. काही दिवसांतच तुम्हाला याचा फरक दिसेल. हे केल्याने तुमचे ओठ गुलाबी आणि तजेल दिसतील. हे मिश्रण फक्त लावायचे नाही तर त्याने ओठांना थोडा मसाज करायचा आहे. 
 
 
गुलाबी ओठांसाठी लिप स्क्रब
बीटरूट तळलेले
एक चमचा बारिक केलेली साखर
थोडासा मध

सर्व प्रथम तुम्हाला बीटरूट तळुन ते उन्हात वाळवाले लागेल. एक दिवस वाळवा आणि नंतर ते खरखरीत बारीक करा. आता तुमची बीटरूट पावडर तयार झाली. शक्य असल्यास तुम्ही बाजारातील बीटरूट पावडरही घेऊ शकता. परंतु, घरी बनविलेली पावडरच वापरणे चांगले राहिल. आता यामध्ये बारिक केलेली साखर घाला आणि थोडासा मध घाला. हा स्क्रब तुम्ही काही दिवस फ्रिजमध्येही ठेवून वापरू शकता. हे तुमच्या ओठांना माॅइश्चराईजही करेल आणि मेलेले कातडेही नष्ट करेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे ओठ सुंदर ठेवू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT