Home Remedies for Kidney Stone 
लाइफस्टाइल

Kidney Stone Home Remedies: मुतखड्याच्या त्रासावर घरगुती रामबाण उपाय

या ५ घरगुती उपायांनी कधीच होणार नाही त्रास

रफिक पठाण

Home Remedies for Kidney Stone: आपल्याला सर्वाना माहितीये कि मुतखड्यामुळे (Kidney stone) पोटामध्ये प्रचंड वेदना होतात. वेळीच त्यावर उपचार न घेतल्यास मूत्रपिंडाचे गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावं लागू शकतं याचसाठी आम्ही ह्या लेखातून पाच घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलोय ज्यामुळे तुम्हाला कधीच मुतखड्याचा त्रास होणार नाही. हे पाच उपाय पाहण्यापूर्वी मुतखडा म्हणजे काय ? हे आधी आपण समजून घेऊ.

मुतखडा म्हणजे काय? (What is Mean by Kidney Stone?)

आपल्या शरीरातील मूत्रपिंडात घन स्वरूपात कठीण असे लहान स्फटिक तयार होतात त्यांना आपण मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन असं म्हणतो. त्याला वैद्यकीय भाषेत रेनल स्टोन्स (renal stones) किंवा नेफ्रोलिथीसिस असं म्हणतात. उपलब्ध माहितीनुसार मुख्यतः चार प्रकारच्या मुतखड्याचा प्रकार (Four types of Kidney stones) रुग्णांमध्ये दिसून येतो. त्यातील सर्वात जास्त ८०% प्रमाणात कॅल्शियम ऑक्सलेट (calcium oxalate) हा प्रकार दिसून येतो.

छोट्या खड्यांमुळे शक्यतो इतका त्रास रुग्णांना होत नाही परंतु मोठ्या आकाराचे खडे मूत्रपिंडातुन बाहेर निघताना रुग्णांना प्रचंड वेदना होतात. व मूत्रपिंडात ते अडकून राहतात व त्यामुळे रुग्णांना पोटात प्रचंड वेदना उलट्या आणि रक्तस्त्रावाचा त्रास होतो. उपलब्ध वैद्यकीय माहितीनुसार मुतखडा हा एक सामान्य आजार असून १२ % पुरुषांना तसेच ५ % महिलांमध्ये हा आजार होतो.

सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला पूर्वी मुतखड्याचा त्रास झाला असेल तर पुढील ५-१० वर्षात पुन्हा मुतखड्याचा त्रास होण्याची ५०% शक्यता असते. त्यामुळेच पुन्हा असा त्रास होणार नाही याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे (Precaution for Kidney Stone) आणि त्यासाठीच खाली दिलेले उपाय केले तर तुम्हाला पुन्हा असा कधीच त्रास होणार नाही.

१. भरपूर पाणी प्या (Drink more Water):

drinking cold water

शरीरातील पाण्याची पातळी (Body water level) हि नेहमीच चांगली असणं फार महत्वाचं आहे त्यामुळे शरीरातील सर्व आवश्यक घटकांचं संतुलन राखण्यास मदत होते. तुम्हाला मूत्रपिंडासंबंधी कोणताही आजार असल्यास भरपूर पाणी पिल्याने मूत्रपिंडाच्या सर्व प्रक्रिया ह्या सुरळीत ठेवण्यास मदत होते. पाणीच्या योग्य प्रमाणात सेवनाने मूत्रपिंडातील लहान लहान स्फटिके एकत्र जमा न होता ते लघवीद्वारे सहजरित्या बाहेर पडतात.

पाण्याव्यतिरिक्त जर सोड्याचे सेवन केलं तर त्यातील असलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे मूत्रपिंडात स्फटिके तयार होण्यास सुरवात होते (avoid cold drink, soda for Kidney stone). त्यामुळे सोडा, कोल्ड्रिंक यामुळे मुतखड्याचा त्रास अजून वाढू शकतो. त्यामुळं शक्यतो या गोष्टी टाळाव्यात.

२. तुमच्या आहारातील आम्ल पदार्थाचे प्रमाण वाढवा (Increase Citric Acid intake):

lemon Iced Tea

आम्ल पदार्थ म्हणजेच आपल्या रोजच्या आहारात लिंबाच्या रसाचं प्रमाण वाढवल्याने मूत्रपिंडाची दैनंदिन प्रक्रिया सुरळीत राखण्यास मदत होते. लिंबू, संत्रा किंवा इतर कोणतेही फळ ज्यामध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्याच्या आहाराने मूत्रपिंडात नवीन ऑक्सलेट तयार होत नाहीत. त्यामुळे नवीन स्फटिके तयार न होता मूत्रपिंडात असलेल्या स्फटिकांचे विघटन होण्यास सुरवात होते.

३. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा (Decrease Salt in Food):

salt

आहारातील मिठाचे प्रमाण अधिक असल्यास तुम्हाला मुतखडा होण्याची संभावना अधिक असते. मिठामध्ये सोडियमचे (Sodium) प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि त्याच्या अधिक सेवनाने मूत्रपिंडात ऑक्सिलेटचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यामुळं मुतखडा होण्याची संभावना वाढते. शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करायचं असल्यास चिप्स, बाहेरील पदार्थ खाण्याचं टाळावं (Sodium causes kidney stone).

४. आवश्यक तितकं कॅल्शियमचं सेवन करा (Have proper diet calcium) :

आहारातील कॅलशियमच्या (Calcium) सेवनाने मुतखडा होण्याचा धोका सर्वाधिक असतो असा खूप जणांना गैरसमज असतो. परंतु योग्य तितक्या कॅलशियमच्या सेवनानं कधीच मुतखडा होत नाही त्याउलट कॅलशियम मधील घटकांमुळे मूत्रपिंडातील ऑक्सलेट कमी होण्यास मदत होते. शरीरातील कॅलशियमचे योग्य प्रमाण ठेवण्यास दुग्धजन्य पदार्थांचा मोठा उपयोग होऊ शकतो (Use dairy products for calcium). शरीरातील कॅल्शियमची मात्रा सांभाळण्यासाठी दूध, दही, पनीर ई. चा वापर वाढवला पाहिजे.

५. मांसाहाराचे प्रमाण कमी करा (Less Nonveg food):

Non-Veg-Food

आहारातील मांसाहारामुळे मुतखडा होण्याचा धोका सर्वाधिक असतो. मांसाहारात सर्वाधिक प्रमाणात प्रथिने असतात (Nonveg includes High proteins). प्रथिनांच्या अधिकच्या सेवनाने मूत्रपिंडात स्फटिके तयार होण्यास सुरवात होते. त्यामुळे मुतखड्याचा त्रास वाढू शकतो. मांसाहारात असणाऱ्या अधिकच्या प्रथिनांचा त्रास कमी करण्यासाठी मांसाहारात मूत्रपिंड (Kidney), यकृत (Liver) टाळावे.

तुम्ही या पाच उपायांचा उपयोग (Five Home remedies for Kidney Stone) दैनंदिन जीवनात केल्यास तुम्हाला मुतखड्याचा त्रास होण्याचा धोका कमी होऊ शकतो. तरी सुद्धा तुम्हाला जर शारीरिक वेदना मुतखड्यामुळे होत असतील तर वैद्यकीय सल्ला हाच सर्वात महत्वाचा ठरेल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अश्याच बातम्यांसाठी नेहमी वाचत राहा www.esakal.com.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT