Home Remedies
Home Remedies esakal
लाइफस्टाइल

Home Remedies : उन्हाळ्यात कपड्यांमधून घामाचा वास जातच नाही, घरातल्याच या वस्तू येतील कामी

सकाळ डिजिटल टीम

Home Remedies : उन्हाळ्यात उन्हाची तिव्रता इतकी असते की तासाभरापूर्वी घातलेल्या कपड्यांना घामाचा तिव्र वास यायला लागतो. त्यामुळे दिवसात दोन दोन कपडे बदलायला लागतता. पण कपडे धुतल्यानंतरही घामाचा वास जात नाही.

काही लोक तर घामाचा वास लपवण्यासाठी जास्त प्रमाणात परफ्युमचा वापर करतात. पण परफ्युम आणि घामाचा वास एकत्र झाल्याने अधिक घाणेरडा वास कपड्याला येऊ लागतो. केवळ एका धुण्यात हा वास जात नाही. त्यामुळे, घामाचा हा वास घालवण्याचे काही घरगुती उपाय आपण आज पाहणार आहोत.

लिंबूचा वापर करा

लिंबू कपड्यांमधून दुर्गंधी दूर करण्यात मदत करेल. त्यासाठी कपडे भिजवणार असलेल्या एका बादलीत पाणी घ्या आणि त्यामध्ये लिंबूचा रस टाका. या पाण्यात तुम्ही घामाचे किंवा कोणताही चिवट वास असलेले कपडे घाला. कपड्यांमधला दुर्गंधी दूर करण्यात यातील ॲसिड गुणधर्म तुम्हाला मदत करतील. तसेच, लिंबूमध्ये असलेले गुणधर्म कपड्यांतून किटाणूही मारतात.

बेकिंग सोडा वापरा

बेकिंग सोडा कपड्यांमधून येणारा दुर्गंधही दूर ठेवेल. कपडे धुताना तुम्हाला फक्त बेकिंग पावडर घालायची आहे. असे केल्याने कपडे स्वच्छ तर होतीलच शिवाय त्यांचा चिवट वासही निघून जाईल. तसेच, कपडे अधिक स्वच्छ आणि पहिल्यापेक्षा पांढरे दिसायला लागतील. (Clothes)

कपडे उन्हात वाळवा

कपड्यांमधून घामाचा वास येतो तेव्हा आपण सगळेच कपडे धुतो. कपडे वारंवार धुतल्यामुळे ते लवकर खराब होतात. अशा वेळी घामाचा वास दूर करण्यासाठी कपडे उलटे करून उन्हात वाळवावेत. असे केल्याने कपड्यांमधून येणारा वास सहज निघून जाईल. (Home Remedies )

कपडे जास्त वेळ भिजवू नका

घाणेरडे कपडे जास्त वेळ साठवून ठेवू नका, फक्त चांगली डिटर्जंट पावडर वापरा. या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन उपाययोजना केल्यास ही समस्या टाळता येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT