Hand Care Tips Sakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips: कडक उन्हामुळे हात काळे पडले? वापरा 'या' घरगुती टिप्स

Summer Hand Care Tips: कडक उन्हात हातांवर टॅन वाढेल असेल तर घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.

Puja Bonkile

home remedies summer remove hand tanning milk curd tomato

एप्रिल महिना सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये तीव्र सूर्यप्रकाशामुळे प्रत्येकजण त्रस्त होतो. यामुळे अनेक लोक उन्हात बाहेर जाणे टाळतात. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना बाहेर जावे लागते. ज्याप्रमाणे तीव्र सूर्यप्रकाशामुळे शरीर डिहायड्रेट होते, त्याचप्रमाणे त्वचेवर तीव्र सूर्यप्रकाशामुळे टॅनिंगची समस्या निर्माण होते. यादिवसांमध्ये चेहऱ्यासह हातावर जास्त टॅनिंग होते.

तुम्ही कितीही हात झाकले तरी सूर्यप्रकाशाचा नकारात्मक परिणाम होतो. टॅनिंग टाळण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारची टॅन रिमूव्हल क्रीम्स बाजारात सहज मिळतील. पण ते क्रिम्स लावून देखील फरक दिसत नाही. यामुळे घरगुती उपाय करून हातांवरचे टॅन कमी करू शकता.

  • दही आणि हळद

उन्हाळ्यात हातांवर होणारे टॅनिंग कमी करण्यासाठी दही आणि हळदीचा वापर करू शकता . यामध्ये असे घटक आढळतात ज्यामुळे त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवते. टॅनिंगची समस्या कमी करण्यासाठी दही आणि हळद मिक्स करून हातावर लावावे. 10 मिनिटानंतर हात कोमट पाण्याने स्वच्छ करावे. असे आठवड्यातून दोनदा करावे.

  • कोरफड जेल

कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी कोरफड जेल वापरू शकता. तसेच टॅनिंगची समस्या देखील कमी करतो. जर रात्री झोपण्यापुर्वी हाताला कोरफड जेल लावले तर टॅनिंगची समस्या कमी होऊ शकते.

  • दही आणि टोमॅटो

टोमॅटोमध्ये असलेले घटक त्वचेला एक्सफोलिएट करतात. यासाठी अर्धा टोमॅटो घ्यावे आणि त्यावर दही टाकावे. हातावर टोमॅटोच्या मदतीने मसाज करावी. यामुळे हातावरचे टॅनिंग कमी होते. तुम्ही असे आठवड्यातून एक किंवा दोनदा करू शकता.

  • कच्च दूध

दूध शरीरासाठी खुप फायदेशीर आहे. हातांवरचे टॅनिंग कमी करण्यासाठी कच्च्या दूधात हळद आणि लिंबू मिक्स करावे. ही पेस्ट हातावर लावावी. 10 मिनिटानंतर हात स्वच्छ पाण्याने हात धुवावे. यामुळे हातांवरील टॅनिंग काही दिवसांमध्ये कमी होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT