essential oils esakal
लाइफस्टाइल

Homemade Mosquito Repellent: डेंग्यू-मलेरियाची भीती वाटत असेल तर वापरा 'हे' 5 तेल

Healthy Tips: डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा.

सकाळ डिजिटल टीम

डासांपासून वेळीच बचाव न केल्यास डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरियासारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी, मार्केटमध्ये अनेक प्रकारची उत्पादने आहेत. ज्यात अनेक प्रकारच्या अँटी-मॉस्किटो कॉइलचा समावेश आहे. पण या सर्व उत्पादनांचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूच अशा काही आवश्यक तेलांबद्दल जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही साइड इफेक्टशिवाय स्वतःला डासांपासून दूर ठेवू शकता.

  • लॅव्हेंडर ऑइल

डासांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर लॅव्हेंडर तेल लावून आरामात फिरायला किंवा झोपू शकता. डास तुम्हाला चावणार नाहीत, त्याचप्रमाणे त्याचा सुगंध तुमचे मन शांत करेल.

  • पेपरमिंट स्प्रे

डासांपासून (Mosquito) बचाव करण्यासाठी, नारळाच्या तेलात पेपरमिंट मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. पेपरमिंट ऑइल डासांना दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.

  • तुळशीचे तेल

तुळशीचे तेल डासांना दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे. यामध्ये कीटक-विरोधक क्षमता आहे ज्यानंतर डास तुमच्यापासून दूर राहतात.

  • लेमनग्रास तेल

लेमनग्रास ऑइलचा वापर डासांना दूर करण्यासाठी दीर्घकाळापासून केला जात आहे.ते वापरल्यानंतर काही तास डास तुमच्यापासून दूर राहतात.

  • निलगिरी तेल

डासांना दूर ठेवण्यासाठी लिंबू आणि निलगिरीचे तेल समान प्रमाणात मिसळा.याशिवाय या तेलात ऑलिव्ह, नारळ, एवोकॅडो तेल मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये ठेवा.आता स्वतःवर फवारणी करा जेणेकरून डास तुमच्यापासून दूर राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT