homemade masks made from watermelon you can make your beautiful hair beauty tips marathi news
homemade masks made from watermelon you can make your beautiful hair beauty tips marathi news 
लाइफस्टाइल

DIY: खरबूज पासून बनवलेले होममेड मास्क पासून तुम्ही बनवू शकता तुमचे सुंदर केस 

अर्चना बनगे

कोल्हापूर : उन्हाळ्याच्या दिवसात अनेक प्रकारची फळे बाजारामध्ये उपलब्ध असतात ही फळे खाण्यासाठी जी अत्यंत स्वादिष्ट असतात या बरोबरच ते आपली त्वचा आणि केसांसाठी ही अत्यंत फायदेशीर होतात. यातीलच एक स्वादिष्ट आणि शरीरासाठी अत्यंत आवश्यक फळ म्हणजे खरबूज होय. खरबूज हे आपण आहारामध्ये समाविष्ट करतो कारण ते शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असते. यापासून आपण हेअर मास्क तयार करून आपले केस सुंदर करू शकतो.

खरबूज मध्ये असलेले अनेक औषधी गुणधर्म आणि त्यामध्ये आपल्या घरातील काही साहित्य घालून तयार झालेले मिश्रण हे केसांसाठी अत्यंत पोषक ठरते. यामुळे केस झडणे कमी होते आपण खरबूज पासून तयार केलेले हेयर मास्क वापरल्याने कशा पद्धतीने केसांचे आरोग्य सुधारते याबाबत माहिती घेऊया.


खरबूज पासून केसासाठी फायदे
 खरबूजच्या वापरामुळे आपले केस मऊ होतात त्याचबरोबर यामध्ये असलेले पोषक तत्व आणि अतिरिक्त पाणी केसांच्या मुळाला कोरडेपणा होण्यापासून वाचवतात.  कोरडेपणामुळे  आपले केस मोठ्या प्रमाणात गळत असतात.  केसांमध्ये खरबूज चा वापर करणे म्हणजे केसासाठी मॉइस्चरायझर होण्यासारखी असते .जे केस तुटणे पासून वाचवते. खरबूज मध्ये इनोशिटल नावाचे पोषकतत्वे असते जे केस गळण्यापासून वाचवते आणि केस वाढण्यासाठी मदत करते. या पासून तयार केलेले मास्क केसासाठी मोठ्या प्रमाणात पोषण देते. 


 खरबूज केळी आणि दही पासुन हेअर मास्क
या पद्धतीने तयार केलेले मास्क केसाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते एका बाजूला खरबूज हे केसांना मोहना देते तर दुसऱ्या बाजूस केळीमुळे आपले फुटलेले केस बरे होतात तसेच दही हे क्लिंजर प्रमाणे काम करते त्यामुळे केसात होणारा कोंडा कमी होतो.

 आवश्यक साहित्य
 खरबुजाचे पल्प 1 कप 
दही अर्धा कप 
केळीचे पल्प अर्धा कप

बनवण्याची पद्धत 
सुरुवातीस खरबूज कापून त्याचे पल्प तयार करा. आणि केळ्याचे ही पल्प तयार करा. हे दोन्ही पल्प एका बाऊल मध्ये घाला आणि त्यामध्ये दही चांगल्या पद्धतीने मिक्स करा तयार झालेले मिश्रण हेअर मास्क म्हणून वापरू शकता.

 वापरण्याची पद्धत
 केसावरती हेअर मास्क लावण्यापूर्वी केस चांगल्या पद्धतीने विभक्त करा. केसाला मुळापासून ते शेंड्यापर्यंत चांगल्या पद्धतीने हेयर मास्क लावा. केस हेअर cap ने तीस मिनिटापर्यंत झाकून घ्या. तीस मिनिटानंतर हे केस पाण्याने धुवा आणि शाम्पू चा वापर करा. हेयर मास्क आठवड्यातून एकदा वापरा यामुळे केसाला एक नवी चमक येईल आणि केस गळणे थांबेल.

खरबूज आणि गुलाब पाण्याचे कंडिशनर
एकाबाजूला खरबूज हे केसांना मॉइश्चरायझर  करते तर दुसर्‍या बाजूस गुलाबजल पोषकद्रव्ये प्रदान करते. दोन्ही घटकामुळे केसांसाठी हे मिश्रण चांगले कंडिशनर म्हणून काम करते.

आवश्यक साहित्य
 खरबुजाचे पल्प एक कप
गुलाबजल दोन चमचे 
तयार करण्याची पद्धत
 हेअर मास्क तयार करण्यासाठी खरबुजाचे पल्प आणि गुलाब पाणी चांगल्या पद्धतीने मिक्स करा दोन्ही  व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हेअर कंडिशनर तयार होईल जे आपण वापरू शकतो.

वापरण्याची पद्धत 
केस चांगल्या पद्धतीने धुऊन घ्या आणि ते व्यवस्थित विभागून ठेवा. केसांच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत मास्क लावा. केसांमध्ये हे मिश्रण कमीत कमी पंधरा मिनिटे ठेवा. पंधरा मिनिटानंतर केस पाण्याने धुवा हे मास्क आठवड्यातून एकदा वापरा यामुळे केसांना नैसर्गिक चमक येते.

 हेअर मास्क चे फायदे 
खरबूज हेअर मास्क हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि यापासून कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. केसाला मजबूत बनवण्यासाठी त्याचप्रमाणे केस गळणे थांबवण्यासाठी काम करते. केसांना प्राकृतिक चमक येथे. यामुळे हे कंडीशनर प्रमाणे काम करते त्याचबरोबर हे हेअर मास्क केस कोरडे होण्यापासून वाचवते. यामुळे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत परंतु केसांशी संबंधित काही समस्या असतील तर हे वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT