with honey tips for face moisturizing at home in kolhapur
with honey tips for face moisturizing at home in kolhapur 
लाइफस्टाइल

त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी मधाचे काही उत्तम पर्याय

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : त्वचेची देखभाल करण्यासाठी बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे लोशन आणि पोशन उपलब्ध आहेत. पण जास्तीत जास्त भारतीय लोक जुन्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतात. आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून घरगुती उपायांवर आपण नैसर्गिक सोंदर्य मिळवतो. तेच  सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण हलदीसासरखे इंटिग्रेडीयेंट्स जास्त असलेले पदार्थ वापरात आणतो.

खूप काळापासून रॉ हनी सौंदर्या सबंधित जोडलेल्या अनेक गोष्टींसाठी सर्वांना माहिती आहे. शहद हे त्वचेच्या अनेक समस्यांसाठी प्रभावी उपाय म्हणून मानला जातो. खासकरून सोरीयासिस, एग्जिमा आणि ड्राय स्किन यांसारख्या समस्यांसाठी आपल्या हीलिंग, अँटी- एन्फ्लेमेंइंटरी झालेल्या जखमांवर पण शहदचा वापर केला जातो. त्याचबरोबर रॉ हनी चेहऱ्यावर देखील लावला जातो. ज्यामुळे सुखलेली आणि काळपट त्वचा दूर होते. नव्या त्वचेला प्रोत्साहन मिळते. तुम्ही जर कोणत्या प्रकारच्यां फेसमास्क बद्दल ऐकले किंवा वाचले असेल. हिवाळ्यामध्ये स्किन माइस्चराइजर खूप गरज असते. शहद त्वचेला तेज देते. आणि चमक ही पाहायला मिळेल. शहद हे त्वचेवरील सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे.

पण गेल्या काही दिवसांमध्ये मोठमोठ्या ब्रॅण्डच्या मधामध्ये मिसळ केल्याच समजल्याने, त्यापासून होणाऱ्या फायद्यावर बरच प्रश्न उठवले. भेसळ केल्याने त्यापासून होणाऱ्या फायद्याची काही गॅरंटी नाही. ही एक चिंतेची बाब आहे. पण तुम्ही चिंता करू नका. मधाशिवाय किचन मध्ये  इंटिग्रेडीयेंट्स असलेल्या पदार्थ त्वचेला मॉइस्चराइज करुन त्वचेची देखभाल करतात. हे उपाय खालीलप्रमाणे  

नारळाचे तेल 

केसांना लावण्यासाठी आणि जेवण बनवण्यावसाठी आपण नारळाचे तेल वापरतो. या तेलामध्ये आवश्यक फैटी ऐसिड्स, व्हिटॅमिन ई, लिनोईलीक असिक आणि लॉरीक ऐसिडसचे प्रमाण अधिक असते. हे एक चांगले माइस्चाराइजर आहे. नारळाचे तेल त्वचा लगेच शोषून घेते त्यामुळं सुकलेली आणि खडबडीत त्वचा हे लगेच माइस्चाराइजर करते. त्याचबरोबर लेरीक ऐसिड्स त्वचेतील कैलेजन स्ट्रकचरची मदत करते. त्यामुळे त्वचा लवचिक राहण्यास मदत होते. जर तुम्ही घरामधे कोरड्या त्वचेला घरगुती फेसपॅक बनवत असाल तर त्यामधे नारळाच्या तेलाचा जरूर वापर करा. 

 दूध

दुधमध्ये व्हिटॅमिन डी, आणि लॅक्टिक असिड भरपूर असते. ज्यामुळे त्वचा मॉइस्चाराइज होण्यास मदत होते. जर तुम्हाला तुमची त्वचा कोरडी अथवा सुरकुत्या जाणवत असेल तर त्वचेवर दूध लावा. त्यामुळे तुम्हाला तुमची त्वचा अगदी मुलायम जाणवेल. कोरडी आणि तेलकट त्वचा दूर करण्यासाठी समान रुपामध्ये हा प्रभावी उपाय आहे.

बदामाचे तेल 

ओमेगा 3 फैटी असिड्स, व्हिटॅमिन ईचे अधिक प्रमाण असलेलं बदाम तेल हे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले जाणले जाते. ओमेगा 3 असिड्स असल्यामुळे बदाम तेल त्वचेचे चांगले पोषण करते. कोरडी त्वचा परत पहिल्यासारखी बनते आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकियेत त्वचा तेलकट आणि चीपचीपी बनत नाही. हे तेल त्वचेवर असलेल्या डागांना दूर करते. त्वचेवर एक चमक पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण जास्त वेळ उन्हात बाहेर असाल तर होणारे त्वचेचे नुकसान बदाम तेलामुळे कमी होते. तुमच्या त्वचेचे टोन आणि टेक्चर मध्येही बदल होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT