लाइफस्टाइल

फ्रीज स्वच्छ करताना अडचण येतेय? वापरा सोप्प्या टीप्स

शर्वरी जोशी

अन्न,वस्त्र, निवारा या जशा मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे काही सुखसोई किंवा चैनीच्या गोष्टी वापरणं हेदेखील त्याच्या जीवनाचाच एक भाग झाला आहे असं दिसून येतं. आज प्रत्येकाच्या घरात टीव्ही, फ्रीज, एसी अशा वस्तू सहज पाहायला मिळतात. परंतु, या वस्तू घरात आणल्यानंतर त्यांची काळजीही तितकीच घ्यावी लागते. अनेकदा आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणली की तिचा सातत्याने वापर करतो. मात्र, त्याच्या मेंटेन्ससकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे या वस्तू कालांतराने खराब होतात. यातच फ्रीजचचं उदाहरण पाहुयात. फ्रीज खरेदी केल्यानंतर साधारणपणे तो १० ते १२ वर्ष व्यवस्थित टिकतो. परंतु, तो नीट मेंटेन करायला हवा. अनेकदा फ्रीजच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात नाही. परिणामी, फ्रीजमधून खराब वास येणं, तो सतत बिघडणं अशा समस्या येतात. त्यामुळे फ्रीज नेमका कसा साफ करावा किंवा त्याच्यात वस्तूंची मांडणी कशी करावी ते जाणून घेऊयात.

१. फ्रीज खरेदी करतांना तुमचं बजेट आणि तो ठेवणार असाल ती घरातील जागा याचा अंदाज घ्या. त्यानुसार खरेदी करा. जर जागेपेक्षा मोठा फ्रीज असेल तर घरात जागेची अडचण होऊ शकते.

२. फ्रीज शक्यतो डबलडोअरचा घ्यावा.

३. फ्रीजमध्ये प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित मांडणी करा. अस्ताव्यस्त वाटेल असं सामान उगाच कोंबू नका.

४. विकत आणलेल्या भाज्या धुवून ठेवा.तसंच नव्या भाज्या ठेवण्यापूर्वी फ्रीजमधील शिळ्या, जुन्या भाज्या टाकून द्या.

५.  आठवड्यातून एकदा तरी फ्रीज डीफ्रॉस्ट करा. फ्रीज डी फ्रॉस्ट केल्यामुळे फ्रीजचं कुलिंग

बॅलन्समध्ये राहतं.

६. फ्रीजमधील अन्नपदार्थ झाकून ठेवा.

७. आठवड्यातून एकदा फ्रीज स्वच्छ करा.

८. आमटी, भाजी असे पदार्थ उरल्यास ते झाकण असलेल्या डब्यात ठेऊन फ्रीजमध्ये ठेवा.

९. फ्रीज स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस हे मिश्रण वापरा.

१०. फ्रीज स्वच्छ करतांना मेन स्वीच बंद करा. तसंच फ्रीज स्वच्छ झाल्यावर लगेच त्याचं दार बंद कर नका.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District Bank Recruitment: पुणे जिल्हा बँक क्लार्क भरतीत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; गुणपत्रक न जाहीर केल्याने उमेदवार संतप्त

फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६ ची नामांकनं जाहीर! 'दशावतार', 'गोंधळ' आणि 'आता थांबायचा नाय!' चा डंका; पाहा सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रींची यादी

Fulambri Governance : लोकांची अडवणूक थांबवा, कामे वेळेत पूर्ण करा : आमदार सुहास शिरसाठ यांचे फुलंब्रीतील अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Farmer Accident Insurance: मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघात विमायोजना लवकरच सुरू : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Mahabaleshwar Kelghar Ghat : केळघर घाटातील काळाकडा येथे दरड हटली, जेसीबी बाहेर; भूस्खलनाचा धोका कायम, रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद

SCROLL FOR NEXT