Gatari Amavasya Esakal
लाइफस्टाइल

Gatari Amavasya: गटारी अमावास्या हे नाव कस पडलं ? यावर्षीची गटारी कधी आहे ?

श्रावण महिणा लागण्याआधीच मासांहारी लोक गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

सकाळ डिजिटल टीम

श्रावण सुरु होणार म्हटलं, की दोन गोष्टी अगदी हमखास आठवतात, एक म्हणजे ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ हे गाणं आणि दुसरं म्हणजे, ‘गटारी अमावस्या !

गटारी म्हणजे मज्जा, मस्ती, भरपेट मांसाहार आणि मदिरापान, अर्थात दारू पिणं. पण गटारी म्हणजे फक्त एवढंच असतं का? आणि मुळात गटारी आणि गटार यांचा काही संबंध असतो, की नसतो हेच आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसतं.

गटारी अमावास्या हे नाव कस पडलं ?

गतहारी अमावस्या म्हणजे गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला हा शब्द म्हणजे गताहार. गत म्हणजे गेलेला, म्हणजेच गताहारचा अर्थ होतो गेलेला/त्यागलेला आहार.यावरुन याला गटारी अमावस्या असे नाव पडले आहे.

या वर्षीची गटारी अमावस्या कधी आहे ?

आपल्या महाराष्ट्रात 29 जुलै पासून श्रावण महिना सुरु होणार आहे. श्रावण सुरु होण्याच्या एक दिवस अधि गटारी अमावस्या साजरी केली जाते. यावर्षी गटारी अमावस्या 28 जुलै रोजी आहे.

गटारी का साजरी केली जाते ?

श्रावण महिन्यात दारू, मांसाहार या गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. म्हणजेच श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात नाही. थोडक्यात काय, तर हा आहार गेलेला असतो. म्हणून श्रावण सुरु होण्याच्या आधीची म्हणजेच आषाढाची अमावस्या गताहारी, साजरी केली जाते आणि पुढच्या महिन्याभरात जे जेवण त्यागायचं आहे, ते भोजन यादिवशी केलं जातं. जसे की, मांसाहार, अल्कोहोलयुक्त पेये आणि कांदा आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ कटाक्षाने टाळतात. त्यामुळे श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळे महाराष्ट्रात गटारी अमावास्या साजरी केली जाते.

गटारी अमावस्याचे महत्त्व काय आहे ?

श्रावण महिणा लागण्याआधीच मासांहारी लोक गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गटारीच्या दिवशी, लोक जवळचे मित्र आणि प्रियजनांसह स्वादिष्ट मांसाहारी पदार्थाचा आस्वाद घेतात कारण श्रावण सुरु झाल्यानंतर चिकन मटण खाणे चुकीचे मानले जाते. कारण पावसाळ्यात येणाऱ्या श्रावण महिन्यात आजारांचा धोका जास्त असतो. त्यामुळे लोक हलके अन्न खाण्यास प्राधान्य देतात. गटारी सणाच्या दिवशी, कुटुंबे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मेजवाणीचा आनंद घेण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात. श्रावणमध्ये वेगवेगळ्या पूजा, व्रत आणि उपवास केले जातात. गटारीचा अर्थ अमर्यादपणे सेवन करणे असे केले जाते. त्यामुळे तुम्ही गटारी अमावस्येला पोट भरून खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT