How is Omicron affecting Intimacy take these precautions
How is Omicron affecting Intimacy take these precautions  
लाइफस्टाइल

ओमिक्रॉनचा लैंगिक संबंधावर परिणाम होतोय का? अशी घ्या काळजी

सकाळ डिजिटल टीम

Relationship Tips in Marathi: कोरोना व्हायरस (Coronavirus)च्या नवा व्हेरिअंट ओमीक्रॉनची (Omicron variant)सर्वांना भिती वाटत आहे. त्यापासून वाचण्यासाठी लोक प्रत्येक प्रयत्न करत आहे पण, एक प्रश्न प्रत्येक जोडप्याच्या(Couple) मनात पडत आहे की, फिजिकल इंटीमेसीवर (Physical intimacy) ओमीक्रॉनचा कसा परिणाम होतो? लोकांना अशी शंका आहे की, लैंगिक संबध ठेवल्यास ओमीक्रॉन पसरू शकतो का? ओमीक्रॉनचे लक्षण भलेही सौम्य असतील पण लोकांवर त्याचा सर्व प्रकारे परिणाम करत आहे. ओमीक्रॉनमुळे लैंगिक संबधावक कसा परिणाम होतो. (Omicron Effect on Sexual Life)

ओमीक्रॉन वाढतोय तणाव

जर तुम्हाला ओमीक्रॉन संसर्ग झाला असेल तर तुमच्या ह्रदयावर आणि मेंदूवर परिणाम करू शकतो. त्यामुळे लोकांमध्ये ताण आणि नैराश्य (Depression)वाढत आहे. बरे झाल्यावर लैंगिक संबधासाठी पूर्वीसारखा उत्साह राहत नाही. लोकांना नेहमी थकवा आहे. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पूर्ण रिकव्हर (Recover) झाल्यानंतर तुम्ही लव लाईफ (Love life)पुन्हा पहिल्यासारखे होईल.

इरेक्टाईल डिसफंक्शन

काही संशोधनानुसार, ओमीक्रॉनने संसर्ग झाल्यानंतर कित्येक पुरूषांना इरेक्टाईल डिसफंक्शनची (Erectile dysfunction) समस्या जाणवत आहे. पण या गोष्टीची खात्री केलेली नाही. एक्सपर्टनुसार, हे सायकॉलॉजिकल फॅक्टरमुळे (Psychological factors)देखील होऊ शकते. त्यासाठी पूर्ण बरे झाल्यानंतर लैंगिक संबध ठेवले पाहिजे आणि अशावेळी डोक पूर्ण शांत ठेवा.

रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम

जर तुम्हाला कोरोना संसर्ग झाला असेल तर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा आल्याचे जाणवेल. त्यामुळे शरीरामध्ये थकवा असेल आणि रोगप्रतिकारशक्ती(Immunity) देखील कमी होऊ शकते. या सर्व गोष्टींचा परिणाम लैंगिक संबधावर होतो आणि तुम्ही आधीसारखे इंटीमेसी एन्जॉय करू शकत नाही.

काळजी घेणे महत्त्वाचे

इन्फेक्शनपासून (Infection) वाचण्यासाठी कोरोना संसर्ग झालेल्यांनी पूर्ण आयसोलेशन (Isolation)मध्ये राहायला पाहिजे. बरे झाल्यानंतर काही आठवडे फिजिकल इंटीमेसीपासून लांब राहा. कोणत्याही प्रकारे घाई केल्यास त्याचा परिणाम रिकव्हरी टाईमवर (Recovery time) होऊ शकतो आणि तुम्हाला

बरे होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT