Meditation For IQ  esakal
लाइफस्टाइल

Meditation For IQ : मेडिटेशन केल्याने फोकस आणि IQ देखील वाढू शकतो? संशोधनात करण्यात आला दावा

गौतम बुद्ध यांनी ज्ञानप्राप्तीसाठी ध्यानाचा मार्ग अवलंबला होता.

Monika Lonkar –Kumbhar

Meditation For IQ : निरोगी जीवनशैलीसाठी आपण रोज व्यायाम, योगा आणि मेडिटेशन करणे गरजेचे आहे. मात्र, या सोबतच तुमचा आहार संतुलित असणे हे फार महत्वाचे आहे. जेव्हा या सगळया गोष्टी जुळून येतील तेव्हा तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. यात काही शंका नाही.

मेडिटेशन केल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. मेडिटेशनला ध्यान असे ही संबोधले जाते. गौतम बुद्ध यांनी ज्ञानप्राप्तीसाठी ध्यानाचा मार्ग अवलंबला होता. गौतम बुद्ध यांनी बुद्धी जागृत करण्यासाठी ध्यानाची मदत घेली होती. ध्यानाच्या मदतीने त्यांनी त्यांच्या मनातील चिंता, क्रोध, तणाव इत्यादी सर्व विकार दूर केले. मानसिक विकारांवर मात करण्यासाठी त्यांनी ध्यानाचा आधार घेतला होता.

रक्तदाब कमी करण्यासाठी, ताण-तणाव कमी करण्यासाठी, मानसिक आरोग्य आणि मूड सुधारण्यासाठी मेडिटेशन करणे फायदेशीर आहे. जर तुम्ही नियमितपणे मेडिटेशन केले तर, स्मरणशक्ती आणि IQ देखील वाढू शकतो, असे काही संशोधनातून समोर आले आहे.

मेडिटेशन केल्याने फोकस आणि IQ कसा वाढतो?

मेडिटेशन केल्याने बुद्ध्यांक (IQ) वाढू शकतो.

असोसिएशन फॉर अप्लाईड सायकोफिजियोलॉजी आणि बायोफीडबॅक यांच्यातर्फे मेडिटेशन संदर्भात एक महत्वपूर्ण संशोधन करण्यात आले. या संशोधनात काही व्यक्तींनी सहभाग घेतला होता.

या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार ज्या व्यक्तींनी मेडिटेशनमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या IQ मधये सरासरी २३% वाढ झाल्याचे दिसून आले. या मागील कारण सांगताना असे म्हटले जाते की, सखोल ध्यान किंवा मेडिटेशन केल्याने मेंदूची क्रिया मंदावते.

तसेच, मंद मेंदूंच्या लहरींसह स्वत:ला पुनरूज्जीवित करण्याची क्षमता यामुळे वाढते. जेव्हा तुम्ही मनाला थोडी विश्रांती देता तेव्हा आपले मन आणि मेंदू अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते. (Meditation For IQ)

डाव्या आणि उजव्या मेंदूमधील संतुलन

अनेक जण मेंदूचा अर्धा भाग हा दुसऱ्या भागापेक्षा जास्त वापरतात. ज्यामुळे, मेंदूमध्ये असंतुलन निर्माण होते. मेडिटेशन केल्याने मेंदूच्या दोन्ही गोलार्धांचा समन्वय साधला जातो. त्यामुळे, नर्व कम्युनिकेशन जलद गतीने होते.

तसेच, जेव्हा डावा मेंदू आणि उजवा मेंदू सामंजस्याने काम करू लागतो, त्यावेळी समस्या सोडवणे सोपे होते. यामुळे, आपली सर्जनशीलता आणखी वाढते.

बुद्धी वाढण्यास मदत होते

आंतरिक बुद्धिमत्ता आपल्या आतल्या आवाजाला विकसित केल्याने आणि आतला आवाज ऐकल्याने प्राप्त होते. या दोन्ही सुप्त क्षमता वाढवण्याचे काम मेडिटेशन करू शकते. ज्यांना अंतर्दृष्टी आणि अंतज्ञान म्हणून ओळखले जाते.

ही विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता कोणत्याही चाचण्यांद्वारे मोजली जाऊ शकत नाही. ही बुद्धिमत्ता सर्व स्तरांवर अत्यंत अनमोल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT