Health Care  esakal
लाइफस्टाइल

Health Care : हिवाळ्यात किती प्रमाणात पाणी प्यावे? कमी पाणी प्यायल्याने होऊ शकते नुकसान

शरीराला योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे त्वचा आणि आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : हिवाळा सुरू झाला की, आपण आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांची देखील काळजी घेतो. मात्र, अनेक जण या थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायला सुरूवात करतात. परंतु, कमी पाणी पिल्यामुळे आपल्या आरोग्याला नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहित आहे का?

कमी पाणी पिल्यामुळे त्वचा रूक्ष होणे, कोरडी होणे या समस्या निर्माण होतात यासोबतच कमी पाणी पिल्यामुळे किडनीवर ही परिणाम होण्याची शक्यता असते.

त्यामुळे, या थंडीच्या दिवसांमध्ये किती प्रमाणात पाणी प्यावे? आणि कमी पाणी पिल्याने काय नुकसान होऊ शकते? त्याबद्द्ल आज आपण जाणून घेणार आहोत.

हिवाळ्यात किती प्रमाणात पाणी प्यावे?

खरं तर प्रत्येक व्यक्तीने दिवसाला ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. शरीराला योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे त्वचा आणि आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. मात्र, शरीरातील पाण्याची गरज ही वय, लिंग, शारीरिक हालचाली आणि गर्भधारणेनुसार बदलते.

काही तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात देखील ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र, शरीराच्या गरजेनुसार पाणी प्यावे. हिवाळ्यात खास करून कोमट पाणी पिणे हे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. त्यामुळे, थंड पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी पिण्यावर भर द्या.

कमी पाणी पिल्याने कोणत्या समस्या उद्भवतात?

शरीर कमजोर होते

आपल्या शरीरात पाण्याती कमतरता असेल तर, शरीर हळूहळू कमजोर होऊ लागते. पाणी हे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. जर शरीरात पाणी कमी असेल तर याचा शरीराच्या संपूर्ण कार्यावर परिणाम होतो.

पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा जाणवू लागतो. यामागील महत्वाचे कारण म्हणजे, रक्ताला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. त्यासोबतच, कमी पाणी पिल्याने बद्धकोष्ठता, डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात.

किडनीवर होतो परिणाम

पाणी कमी पिल्यामुळे याचा आपल्या किडनीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. कारण, शरीरात पाण्याची कमतरता असेल तर किडनीचे कार्य सुरळीत पार पडण्यास अडथळे येतात. त्यामुळे, किडनीचे काम सुरळीत होण्यासाठी शरीरात पाण्याचा व्यवस्थित पुरवठा असणे फार महत्वाचे आहे.

जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा, किडनीवर ताण येतो. त्यामुळे, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन सारख्या आणि किडनी स्टोन सारख्या गंभीर समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी नवी मोकळी जागा! ५०० एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करणार; राज्य सरकारची दमदार घोषणा

Pune Police action Video : पुणे पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर! कोयता गँगला चोपल्यानंतर, आता गाड्या फोडणाऱ्यांचीही काढली धिंड!

Latest Marathi News Live Update: गोवा आणि कोकणापलीकडेही समाजसेवेचा वारसा

SMAT 2025: १ चौकार, १ षटकार मारला, पण वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला, संघही ११२ धावांत ढेपाळला

Explained: च्यवनप्राशमधील आयुर्वेदिक घटक शरीराला कसे देतात ताकद? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT