लाइफस्टाइल

Overthinking Side Effects : कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं आरोग्यासाठी हानिकारक, या गंभीर आजारांना द्याल आमंत्रण

कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं आरोग्यासाठी हानिकारक...

Aishwarya Musale

बर्‍याचदा आपल्या मनात अनेक गोष्टी चालू असतात आणि आपण त्यांचा विचार करू लागतो, काही काळानंतर आपण त्या गोष्टी विसरतो पण काही लोक खूप विचार करतात. जी एक नकारात्मक सवय आहे. जास्त विचार केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. चला तर जाणून घेऊया अतिविचार केल्याने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो.

अतिविचार केल्यामुळे तुम्हाला हे आजार होऊ शकतात

अतिविचारामुळे तुमचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. या सवयीमुळे तुम्हाला चिंता, पॅनीक अटॅक आणि नैराश्य यासारख्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तुम्ही पर्सनॅलिटी डिसऑर्डरचे शिकार होऊ शकता.

जास्त विचार केल्याने तुम्ही तणावाचे शिकार बनू शकता आणि हा ताण हाय बीपीचा बळी ठरू शकतो. खरं तर तुम्ही जास्त ताण घेतल्यास स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉलचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात करतो ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. रक्तवाहिन्या अरुंद होतात. आणि तुमचे बीपी काही काळ वाढते.

जास्त विचार केल्यामुळे तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुमच्या मनात एकच विचार फिरत राहतो आणि तुमचे मन विश्रांतीच्या स्थितीत जाऊ शकत नाही. जेव्हा असे विचार सतत येत असतात तेव्हा झोपेच्या हार्मोनवर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला निद्रानाश सारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

अतिविचारामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. जास्त विचार केल्यामुळे, तुम्हाला छातीत दुखणे आणि अस्वस्थतेची लक्षणे जाणवू शकतात.

अतिविचारामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होऊ शकते ज्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT