Raksha Bandhan  sakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2023: राखी बांधताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे आणि कोणत्या मंत्राचा जप करावा? जाणून घ्या

राखी बांधताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे आणि कोणत्या मंत्राचा जप करावा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Aishwarya Musale

राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. 

बहिण जेव्हा भावाल राखी बांधते त्यावेळी परंपरेनुसार औक्षण केले जाते. औक्षण करताना भावाने कुठल्या दिशेला बसावे, रक्षाबंधनापुर्वी औक्षण कसे करावे याविषयी आपण जाणून घेवूया.

राखी बांधताना कुठल्या दिशेला बसावे?

जेव्हा बहिण आपल्या भावाला राखी बांधत असेल तेव्हा भावाने पुर्व दिशेकडे मुख करुन जमिनीवर आसन टाकून त्यावर बसावे. बहिणीने पश्चिम दिशेकडे मुख करुन भावाच्या कपाळी कुंकू तथा चंदनाचा टिळा सोबत अक्षता याचे तिलक करावे. यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी.

राखी बांधताना या मंत्राचा उच्चार करावा

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:।

तेन त्वां अभिबन्धामि रक्षे मा चल मा चल।।

शास्त्रांप्रमाणे राखी बांधताना या मंत्राचा जप केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT