Break Bad Habits
Break Bad Habits Sakal
लाइफस्टाइल

Break Bad Habits: वाईट सवयी कशा बदलाव्यात? या 5 टीप्स करा ट्राय

सकाळ डिजिटल टीम

Break Bad Habits: सवय म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एकाच पद्धतीने बराच काळ नियमितपणे करतो, त्याला कार्याला आपण सवयीचा भाग म्हणतो. या सवयींचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावरही पडतो. यातील काही सवयी या चांगल्या, तर काही वाईट असतात.

एकदा लागलेली सवय मोडणे आणि एखादी नवीन सवय आंगिकारणे अवघडच असते. परंतु, प्रयत्न केले, तर या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. दरम्यान, आपण आपल्याला असलेली वाईट सवय कशी मोडू शकतो, हे जाणून घेऊ.

आधी वाईट सवयी शोधा

आपण रोजच्या गोष्टी करत असताना आपल्याला असलेल्या वाईट सवयी पटकन लक्षात येत नाहीत. परंतु, एकदा आत्मपरिक्षण करून आपल्यातल्या वाईट सवयी आधी शोधा. जर वाईट सवयी कोणत्या आहेत, हे लक्षात आले, कर त्यावर काम करणे अधिक सोपे होईल.

सवयीला दुसऱ्या सवयीने बदला

एखादी सवय पूर्णपणे बंद करणे कठीण असते, त्यामुळे मानसिक त्रासही होऊ शकतो. अशावेळी एखादी सवय थेट बंद करण्यापेक्षा त्या सवयीला दुसऱ्या एखाद्या चांगल्या सवयीने बदलणे फायदेशीर ठरू शकते.

उदा. जंकफुडची सवय असेल, तर त्याऐवजी घरी केलेला एखादा चांगला पदार्थ किंवा एखादं फळ खाल्ले, तर भूकही भागते आणि खाण्याची इच्छाही पूर्ण होते.

हळुहळू प्रयत्न करा

एखादी सवय अचानक बदलू शकत नाही. त्यामुळे हळुहळू बदल घडवा. अचानक सवय बदलण्याचा शरिरावर आणि मनावर परिणाम दिसू शकतो, जो कधीकधी घातकही ठरू शकतो. अशावेळी हळुहळू प्रयत्नपूर्वक सवय बदला.

सातत्य ठेवा

वाईट सवयीऐवजी जी चांगली सवय तुम्ही स्विकारणार आहात, त्याच्यात सातत्य ठेवा. त्यामुळे तुमच्या जुन्या वाईट सवयीचा विसर पडून तुम्हाला नवीन आणि चांगली सवय लागू शकते.

उदा. रात्री लवकर झोपायची सवय लावायची असेल, तर रोजची रात्री झोपायची वेळ एकच ठरवून घ्या. त्याच वेळी तुमच्या झोपेच्या जागेवर जा. पहिले काही दिवस ठरवलेल्या वेळी झोप येणार नाही, पण रोज प्रयत्न केल्यास तुमच्या शरीराला ती सवय लागेल.

दूरचा विचार करा

दरम्यान ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे की जी वाईट सवय सोडून तुम्ही नवीन सवय आत्मसात करत आहात, त्याला तुम्हाला दीर्घकाळ फायदा होणार आहे. अन्यथा बदलली सवय थोड्याच कालावधीत तुमच्यासाठी दुसरी वाईट सवय ठरणार असेल, तर त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे दूरचा विचार करून नवीन सवय लावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT