Travel Tips esakal
लाइफस्टाइल

Travel Tips : ट्रॅव्हल पॅकेज बुक करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या खबरदारी, प्रवासाचा आनंद आणखी वाढेल

फिरायला जायला तर सगळ्यांनाच आवडते. अनेक जण ग्रुपमध्ये किंवा एकट्याने फिरायला जातात. मात्र, प्रवासाचा आनंद घेण्यापूर्वी आणि तुम्ही कोणतेही पॅकेज बुक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे हे फार महत्वाचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Travel Tips : फिरायला जायला तर सगळ्यांनाच आवडते. अनेक जण ग्रुपमध्ये किंवा एकट्याने फिरायला जातात. मात्र, प्रवासाचा आनंद घेण्यापूर्वी आणि तुम्ही कोणतेही पॅकेज बुक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे हे फार महत्वाचे आहे.

नवीन ठिकाणी फिरायला जाण्यासाठी अनेक जण विविध कंपन्यांचे टूर पॅकेज घेतात. त्याचे बुकिंग काही दिवस आधीच करतात. मात्र, टूर पॅकेजचे बुकिंग करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टींची खबरदारी घेणे देखील महत्वाचे आहे.

कोणत्या आहेत त्या गोष्टी? ज्यांची खबरदारी तुम्ही टूर पॅकेज बुक करण्यापूर्वी घ्यायला हवी. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या लेखातून. टूर पॅकेज बुक करण्यापूर्वी तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्याकडून कोणत्याही चुका होणार नाहीत आणि तुम्ही प्रवासाचा उत्तम प्रकारे आनंद घेऊ शकाल.

ठिकाणांबद्दल माहिती घ्या

तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात. त्या ठिकाणांबद्दल तुमच्या ट्रॅव्हल एजंटकडून किंवा टूर पॅकेज कंपनीकडून योग्य प्रकारे माहिती घ्या. तुम्हाला कोणती ठिकाणे दाखवली जाणार आहेत? तेथील प्रवेश शुल्क किंवा त्यासह इतर खर्च किती येईल? याची माहिती घ्यायला विसरू नका.

तसेच, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल? तुमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी केली जाईल? या सगळ्याची माहिती घेऊनच तुम्ही टूर पॅकेज बुक करा.

सोयी-सुविधा जाणून घ्या

ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात? तिथे तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत?याची ट्रॅव्हल कंपनीकडून किंवा तुमच्या ट्रॅव्हल एजंटकडून माहिती घ्या. राहण्याचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, वाहतूक ते हॉटेलपर्यंतचा खर्च किती आहे? शिवाय, या सगळ्या सोयी-सुविधा पॅकेजमध्ये आहेत की नाही? याची खात्री करून घ्या. त्यानंतरच, पॅकेज बुक करण्याचा विचार करा.

कागदपत्रांबद्दल माहिती घ्या

ट्रॅव्हल पॅकेजचे बुकिंग करण्यापूर्वी तुम्हाला प्रवासामध्ये कोणती कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील? याची माहिती एजंटकडून घ्या. काही पर्यटन स्थळांवर फोटो, ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आदी विशेष कागदपत्रे लागतात. त्या शिवाय, पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे, या सर्व कागदपत्रांची आधीच माहिती घ्या आणि ही कागदपत्रे सोबत ठेवायला विसरू नका.

हिडन चार्जेस (छुपे शुल्क) कन्फर्म करून घ्या

अनेक वेळा असे होते की, प्रवासाला जाण्यासाठी तुम्ही इतके उत्साही असता की, या सगळ्या गडबडीत तुम्ही हिडन चार्जेसबद्दल (छुपे शुल्क) माहिती न घेताच टूर पॅकेज बुक करता. असे अजिबात करू नका, कारण असे केल्याने तुमचे बजेट बिघडू शकते. त्यामुळे, नंतर अचानक अतिरिक्त पैसे भरण्यापेक्षा तुम्ही आधीच एजंटकडून या छुप्या शुल्काबद्दल विचारून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT