आजकाल जवळपास सगळ्यांमध्येच फोटोग्राफीची आवड निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अगदी कॉलेजला जाणाऱ्या मुलांकडेही महागडे कॅमेरे पाहायला मिळतात. खरं तर एकेकाळी फक्त प्रोफेशनल फोटोग्राफर्सकडेच DSLR कॅमेरा पाहायला मिळायचा.परंतु, सध्याच्या काळात फोटोग्राफीची आवड असणाऱ्या असंख्य जणांकडे हा कॅमेरा सहज पाहायला मिळतो. परंतु, हा कॅमेरा वापरताना बरीच काळजी घ्यावी लागते. अनेकांना DSLR हाताळण्याचं योग्य प्रशिक्षण किंवा टेक्निक माहीत नसल्यामुळे तो लवकर खराब होतो. त्यातच या कॅमेराची लेन्स महाग असल्यामुळे ती खराब झाल्यावर पुन्हा नवीन घेणं थोडं खर्चिक असतं. म्हणूनच,DSLR ची लेन्स कशी स्वच्छ करावी ते पाहुयात. (how to clean dslr camera lens easy home-tips)
१. ब्लोअरचा वापर करा -
कॅमेराच्या लेन्सवर चिकटलेली धूळ, माती काढण्यासाठी ब्लोअरचा वापर करा. अनेक जण लेन्स खराब झाल्यावर हातानेच ती स्वच्छ करतात. परंतु, बोटांचा वापर केल्यामुळे लेन्स लवकर खराब होऊ शकते. तसंच त्याच्यावर स्क्रॅचदेखील पडू शकतात. त्यामुळे लेन्स कायम ब्लोअरचा वापर करुनच स्वच्छ करावी.
२. लेन्स क्लिनर लिक्विडचा वापर -
लेन्सवर एखादा डाग पडला तर अनेक जण ओल्या कापडाने तो पुसतात. परंतु, त्यामुळे लेन्स खराब होऊ शकते. ज्यामुळे फोटो काढताना फोटोची क्वालिटी बिघडू शकते. त्यामुळे लेन्सवर कोणताही डाग पडला तर केवळ लिक्विड क्लिनरचाच वापर करावा.
३. कॉटन बड्स -
अनेकदा लेन्सच्या कोपऱ्यामध्ये धूळ साचून राहते. ही धूळ पटकन काढणं शक्य होत नाही. अशा वेळी क्लिनर लिक्विड कॉटन बड्सवर घेऊन त्याने लेन्सचे कोपरे स्वच्छ करावेत.
लेन्स साफ करताना 'या'कडे करु नका दुर्लक्ष
१. लेन्स स्वच्छ करताना त्यावर तोंडाने कधीच फुंकर मारू नका. कारण, बऱ्याचदा तोंडातून लाळेचे लहान लहान थेंब लेन्सवर पडू शकतात. ज्यामुळे लेन्स लवकर खराब होते.
२. कॅमेराचं काम झाल्यावर तो कायम बॅगमध्येच ठेवावा. तसंच या बॅगमध्ये क्लिनिंग लिक्विड, क्लिनिंग ब्रश आणि क्लिनिंग टिश्यू ठेवावा.
३.लेन्सला कधीही बोटांनी थेट स्पर्श करु नये.
४. लेन्स स्वच्छ करताना कायम मायक्रोफायबर क्लॉथचाच वापर करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.