लाइफस्टाइल

Charging Cable: लॅपटॉप,मोबाईल चार्जरची वायर अस्वच्छ झालीय? करा 'हे' घरगुती उपाय, येईल नवी चमक

Charging Cable: जर लॅपटॉप, मोबाईल चार्जरची वायर अस्वच्छ झाली असेल तर ती स्वच्छ करणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

Puja Bonkile

how to clean laptop mobile charger cable

चार्जर हे एक महत्त्वाचे साधन आहे. जे लॅपटॉपचे सेल्फ लाइफ वाढवण्यासाठी आणि त्याला पॉवर देण्यासाठी मदत करते. परंतु, घाईघाईने आपण वायरचा कसाही वापर करतो. त्याची स्वच्छता ठेवत नाही. यामुळे वायर खुप घाण होते. चार्जिंग वायर योग्यरित्या स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया लॅपटॉप,मोबाईल चार्जरचे वायर स्वच्छ करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या घरगुती उपायाचा वापर करावा.

  • लिंबाचा रस आणि पाणी

तुम्ही चार्जर स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी सर्वात पहिले तुम्हाला लिंबू रस आणि पाणी याचे मिश्रण तयार करावे लागेल. नंतर त्या मिश्रणात कापूस भिजवा, तो पिळून घ्या आणि त्याच्या सहाय्याने वायर चांगली पुसून टाका. असे केल्याने चार्जरचा वायर नवीनसारखा दिसेल.

  • शेव्हिंग क्रीम

घरी ठेवलेल्या शेव्हिंग क्रीमने तुम्ही वायर सहज स्वच्छ करू शकता. सर्वात पहिले वायरवर शेव्हिंग क्रीम लावा आणि सुमारे 5 मिनिटे कोरडे होऊ द्या. नंतर थोड्या ओलसर कापसाने वायरवरील शेव्हिंग क्रीम पूर्णपणे पुसून टाका.चार्जिंग वायर नव्यासारखी दिसेल.

  • वेट टिश्यु

तुम्ही चार्जर स्वच्छ करण्यासाठी वेट टिश्युचा देखील वापर करू शकता. तुमची वायर जास्त घाण झाली नसेल तर फक्त वेट टिश्युने स्वच्छ पुसावे.

  • चार्जरचा वायर स्वच्छ करताना पुढील गोष्टी ठेवा लक्षात

चार्जरचा वायर स्वच्छ करण्यापूर्वी पॉवरपासून डिस्कनेक्ट करावा.

चार्जरचा वायर पाण्यात चुकूनही बुडवू नका.

जर वायर खूप घाण झाला असेल तर तो बदलावा.

चार्जरचा वायर स्वच्छ केल्यानंतर 10-20 मिनिटे उन्हात ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs PAK : वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यास दिला नकार! प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सर्व काही खरं सांगितलं

Talathi Bharti 2026: MPSC कडून तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर! जाणून घ्या पेपर पॅटर्न, विषय आणि गुणपद्धती

रामाच्या भूमिकेसाठी रणबीरने केला योग, ध्यान आणि धर्मग्रंथाचा अभ्यास; रामायणासाठी जाणून घेतलं प्रभू श्रीरामांचं तत्वज्ञान

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

अलोक नाथ यांच्यावर अभिनेत्रीने केलेले अत्याचाराचे आरोप; स्वत:चा अनुभव सांगत नारायणी शास्त्री म्हणाली, 'त्यांनी कधी आमच्यासोबत...'

SCROLL FOR NEXT