Switch board Esakal
लाइफस्टाइल

Switch board: घरातील काळे पडलेले स्विच बोर्ड कमी वेळात कसे स्वच्छ करायचे?

इलेक्ट्रिकल स्विच कसे साफ करावे? साफ करतांना कोणती काळजी घ्यावी याचीच सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

घरातील किचन, बेडरूम,हॉल मधील इलेक्ट्रिकल स्विच आणि स्विच बोर्ड खूप घाण होतात कारण सतत कुणी तरी लाईट, टिव्ही, पंखा चालु बंद करण्यासाठी स्विचाचा वापर करत असतो. मग तेव्हा घरातील गृहिणीला प्रश्न पडतो की हे इलेक्ट्रिकल स्विच साफ तरी कसे करावे?

चला तर मग आज आपण या लेखात इलेक्ट्रिकल स्विच कसे साफ करावे? साफ करतांना कोणती काळजी घ्यावी याचीच सविस्तर माहिती पाहणार आहोत.

काळे झालेले स्विच बोर्ड साफ करण्यापूर्वी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वीजपुरवठा बंद करा.

अन्यथा तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो. घरातील इतर सदस्यांनाही वीजपुरवठा बंद करण्याबाबत माहिती द्या, जेणेकरून साफसफाई करताना चुकूनही वीज चालू केली जाणार नाही. नंतरच मग इलेक्ट्रिकल स्विच आणि स्विच बोर्ड साफ करायला घ्यावे.

इलेक्ट्रिकल स्विच आणि स्विच बोर्ड साफ करतांना प्रथम एका मग्यात 3-4 चमचे टूथपेस्ट घ्या आणि त्यात 2 चमचे बेकिंग सोडा टाकून चांगले मिसळुन घ्यावे. यानंतर, त्यात पाण्याचे काही थेंब टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी आणि नंतर ती स्विच बोर्डवर लावावी.

दहा मिनिटांनंतर, टूथब्रश किंवा क्लिनिंग ब्रशने स्विच बोर्ड घासून घ्यावे आणि नंतर कोरड्या कापडाने पुसून घ्यावे.यानंतर तुमच्या घरातील सगळे इलेक्ट्रिकल स्विच आणि स्विच बोर्ड अगदी नव्यासारखा दिसतील. दात स्वच्छ करण्याव्यतिरिक्त, टूथपेस्टचा वापर इतर अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. तुम्ही टूथपेस्टचा वापर स्विच बोर्ड साफ करण्यासाठी देखील करू शकता. टूथपेस्ट स्विच बोर्डवरील डाग आणि घाण पूर्णपणे साफ करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT