Anger sakal
लाइफस्टाइल

तुमचा रागीट स्वभाव आहे? करा हे उपाय

रागावर नियंत्रण कसे ठेवावे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

सकाळ डिजिटल टीम

राग येणे हा मानवी स्वभाव आहे. मात्र सतत छोट्या छोट्या गोष्टीवरुन तुम्हाला राग किंवा चिडचिड करण्याची सवय असेल कर नक्कीच ही एक खुप मोठी समस्या आहे.

कोणतीही इच्छित गोष्ट जेव्हा मनासारखे होत नाही तेव्हा राग येतो. रागीट स्वभावाच्या व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रागावर नियंत्रण कसे ठेवावे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. खालील काही उपाय करत तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकता.

प्रतिक्रिया लगेच देऊ नका.

जेव्हा आपल्याला वाटते कि तुम्ही रागात आहात तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया लगेच देऊ नका. प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांत व्हा आणि लांब श्वास घ्या यामुळे आपल्याला रागावर नियंत्रण करण्यात मदत होईल

ब्रेक घ्या

जर आपल्याल राग कंट्रोल होत नसेल आणि जेव्हा आपल्याला राग खूप येत असल्याची जाणीव होइल तेव्हा आपण कोणत्याही विवादात पडू नये कारण तेव्हा आपले नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगले हेच राहील कि तुम्ही ब्रेक घ्या.

रागाचे कारण ओळखा –

रागाशी डील करण्यासाठी सर्वात आवश्यक हे शोधणे आहे की राग कशामुळे येतोय. रागाचे कारण समजून घेणे आवश्य आहे.

योगा आणि व्यायाम करा - व्यायाम आणि योगामुळे कमी होतो. व्यायम जसे swimming, morning walk आणि योग यामुळे रागावर कंट्रोल केला जाऊ शकते. सकाळच्या ताज्या हवेमध्ये निसर्गासोबत काही वेळ राहणे, दीर्घ श्वास घेणे इत्यादी गोष्टींमुळे मनाला शांती देतात.

छान झोप घ्या

कधी-कधी जास्त कामाच्या टेंशनमुळे आम्ही व्यवस्थित झोपू शकत नाही. ज्यामुळे डोकेदुखी, तनाव आणि चिडचिड होते. आणि त्यामुळे आम्ही विनाकारण दुसऱ्यावर ओरडतो. यासाठी 7 तासांची झोप घेणे, गरजेचे आहे.

खरं तर आपल्या रागाला दाबू नका. आपल्या रागामागे कारणे ओळखा आणि रागाला दूर करण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT