High BP:
High BP: Sakal
लाइफस्टाइल

High BP: उच्च रक्तदाब नैसर्गिकरित्या कंट्रोल करायचय? मग आजपासूनच सुरू करा 'हे' काम

पुजा बोनकिले

how to control high bp naturally avoid stress salt

आजच्या धावपळ आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या वाढत चालली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्तदाबाची सतत तपासणी करत राहणे आवश्यक आहे आणि आहारातही काही बदल करणे आवश्यक आहे. रोजच्या जीवनशैलीत कोणते बदल केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो हे जाणून घेऊया.

  • मीठ आणि मसाल्यांचे पदार्थ खाणे टाळावे

जर तुम्हाला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुमच्या जेवणात मीठाचे सेवन मर्यादित करावे. कारण जेवणात मीठ आणि मसाल्यांचे पदार्थ जास्त खाल्ल्यास उच्च रक्तदाब वाढू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहानपणापासूनच मुलांच्या मीठ खाण्याच्या सवयीवर पालकांनी नियंत्रण ठेवल्यास पुढे त्यांना रक्तदाबाचा त्रास होणार नाही.

  • पुरेशी झोप

जर तुमचा रक्तदाब उच्च राहत असेल तर तुम्ही तुमच्या झोपण्याची वेळे निश्चित करावी. आरोग्य तज्ज्ञांच्या मते रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि सकाळी कमी झोपणे यामुळे उच्च रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवायचे असेल तर रात्री पुरेशी म्हणजेच ७ ते ८ तासांची झोप घ्यावी.

  • राग आणि चिंता करू नका

आरोग्य तज्ज्ञांच्या मते जर तुम्हाला लवकर राग येत असेल आणि नेहमी चिंता करत असाल तर त्यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. अशावेळी तुमच्या वागण्यात आणि आहारात बदल करून औषधाशिवाय नियंत्रण तुम्ही उच्च रक्तदाब सहज नियंत्रित ठेऊ शकता.

  • योग

उच्च रक्तदाबाची समस्या कमी करायची असेल तर नियमितपणे योग करणे गरजेचे आहे. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी ४५ मिनिटे चालावे. यामुळे देखील रक्दाब नियंत्रणात राहतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT