Parenting Tips  esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुले इतरांशी उद्धटपणे वागतात? मग, ‘या’ टिप्सच्या मदतीने करा सुधारणा

मुलांवर चांगले संस्कार करणे हे पालकांचे कर्तव्य असते. यासोबतच त्यांच्यासाठी हे कर्तव्य पार पाडणे मोठे आव्हानात्मक असते. जोपर्यंत तुमची मुले लहान आहेत, तोपर्यंत त्यांना सुरूवातीपासूनच चांगले वळण लावणे आणि समजावून सांगणे, शिकवणे सोपे जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Parenting Tips : मुलांवर चांगले संस्कार करणे हे पालकांचे कर्तव्य असते. यासोबतच त्यांच्यासाठी हे कर्तव्य पार पाडणे मोठे आव्हानात्मक असते. जोपर्यंत तुमची मुले लहान आहेत, तोपर्यंत त्यांना सुरूवातीपासूनच चांगले वळण लावणे आणि समजावून सांगणे, शिकवणे सोपे जाते. परंतु, जसजसे तुमचे मूल मोठे होते, तसतसे त्याची वागणूक आणि विचार बदलतात.

मग, अशा परिस्थितीमध्ये मुले सहसा इतरांचा अनादर करतात. इतर लोकांशी उद्धट वागतात आणि उद्धटपणे बोलतात. जेव्हा हे पालकांना कळतं तेव्हा त्या क्षणी अनेक पालक मुलांना याबद्दल फटकारतात. परंतु, मुलांच्या वागण्यात काही बदल होत नाही.

अशा परिस्थितीमध्ये पालकांनी मुलांना नीट समजावून सांगायला हवे. तो का असे वागतोय? हे जाणून घ्यायला हवे. त्याच्या या सवयी सुधारण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. त्या टिप्सच्या मदतीने तुम्ही मुलांना चांगल्या सवयी लावू शकता.

उद्धट वागण्यामागचे कारण जाणून घ्या

तुमचा मुलगा किंवा मुलगी उद्धटपणे का वागत आहेत? हे सर्वात आधी जाणून घ्या. त्याच्या अशा वागण्यामागचे कारण जाणून घ्या. मुलांना चांगले वळण लावण्यासाठी किंवा त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

कदाचित असे असू शकते की, तुमचा मुलगा एखाद्या गोष्टीबद्दल नाखूष आहे किंवा तो असमाधानी आहे. तुमच्या मुलाच्या मनातील गोष्टी काढून घ्या, तो असा का वागतोय ते त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भातील उपाय शोधता येईल आणि त्याच्या वर्तनात बदल करता येईल.

नियम बनवा

प्रत्येक गोष्टीसाठी शिस्त आणि नियम असणे हे फार महत्वाचे आहे. हे जर व्यवस्थितपणे पार पडले तर मुलांना योग्य वळण लागण्यास मदत होते. तुमच्या मुलांसाठी देखील तुम्ही नियम बनवा.

मुलांना या नियमांबद्दल समजावून सांगा. तसेच, हे नियम मुलांनी पाळण्याची आवश्यकता का आहे? ते त्यांना सांगा. खरं तर जेव्हा तुमची मुले तुम्ही तयार केलेल्या नियमांचे पालन करतील आणि शिस्तीत वागतील, तेव्हा ते गैरवर्तन करणे टाळतील.

मुलांवर ओरडू नका

मुले जेव्हा उद्धटपणे वागतात, तेव्हा अनेकदा त्यांच्या वर्तनामागचे कारण हे सभोवतालचे वातावरण आणि त्याला लावण्यात येणारे वळण असू शकते. कारण, अशा गोष्टींमधूनच मुले ही उद्धट वर्तवणूक करायला शिकतात. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुमचे मूल उद्धटपणे वागले तर त्याच्यावर लगेच ओरडू नका. मुलाला प्रेमाने समजावून सांगा आणि मुलगा शांत झाल्यावर त्याच्याशी बोला. तो असे का वागला ते विचारा आणि त्याच्याशी शांतपणे बोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

Video Viral: ''पागल झालास.. पप्पाला घेऊन आलास'', गर्लफ्रेंडने केलं ब्रेकअप, पठ्ठ्या बापालाच घेऊन गेला, मग तिने झापझाप झापलं

Artificial Flowers Ban: सजावटीसाठी आता कृत्रिम फुलांचा वापर केलात कारवाई होणार! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?

Pakistan Semi Final Scenario: पाकड्यांना उपांत्य फेरीचं गणित वाटतं तेवढं सोपं नाही... १५५ धावांनी विजय ते ४.२ षटकांत १०० धावांचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT