natural herbs  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: या औषधी वनस्पतींनी अँक्झायटीला म्हणा गुड बाय! तणावातून मिळेल आराम

औषधी वनस्पतींसह अँक्झायटी कशी कमी करावी? जाणून घ्या.

Aishwarya Musale

आजच्या स्ट्रेस फुल जीवनशैलीत अनेक लोक डिप्रेशन आणि अँक्झायटीसारख्या समस्यांना बळी पडतात. अँक्झायटीचे औषधे घेतल्याने आरोग्यावर काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात, ज्यामुळे बरेच लोक चिंतेचा सामना करण्यासाठी औषधी वनस्पती आणि नॅच्युरल हर्ब्सची मदत घेण्यास प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत तुम्हीही यांचं सेवन करून अँक्झायटीला कायमचं गुड बाय म्हणू शकता.

हेल्थलाइन डॉट कॉमच्या मते, अँक्झायटीला हाताळण्याचे काही नैसर्गिक मार्ग आहेत. तुमच्या आहारात त्यांचा समावेश करून तुम्ही केवळ अस्वस्थतेपासून आराम मिळवू शकत नाही तर स्वतःलाही आरामात ठेवू शकता.

औषधी वनस्पतींसह अँक्झायटी कशी कमी करावी

औषधी वनस्पतींचे सेवन केल्याने शरीरातील स्ट्रेस रिलीज करणारे हार्मोन्स कमी होतात, ज्यामुळे तुम्ही लवकरच अँक्झायटी आणि तणावापासून मुक्त होऊ शकता. त्याच वेळी, काही औषधी वनस्पती खाल्ल्याने मेंदूमध्ये एमिनोब्युटीरिक ऍसिडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तुम्हाला पुरेशी झोप घेण्यास मदत होते.

अश्वगंधा

अश्वगंधा भारतीय आयुर्वेदात शतकानुशतके वापरली जात आहे. तणाव आणि अँक्झायटी यांच्याशी लढण्यासाठी अश्वगंधाचे सेवन उत्तम आहे. दररोज अश्वगंधा खाल्ल्याने केवळ झोपेची गुणवत्ता सुधारते असे नाही तर तणाव आणि चिंता देखील कमी होते.

कॅमोमाइल

कॅमोमाइलचे सेवन देखील तणाव आणि अँक्झायटीपासून मुक्त होण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. तुम्ही चहा, टॅब्लेट किंवा स्किन क्रीमच्या स्वरूपात कॅमोमाइल वापरू शकता. दररोज 15,00 मिलीग्राम कॅमोमाइलचे सेवन केल्याने तुम्हाला अँक्झायटी डिसऑर्डर होण्याचा धोका नाही. त्याच वेळी, ऍलर्जीक प्रतिक्रिया टाळण्यासाठी कॅमोमाइलचे सेवन सर्वोत्तम असू शकते.

लॅव्हेंडर

अँक्झायटीपासून मुक्त होण्यासाठी घरात लॅव्हेंडरचे रोप लावणे चांगले मानले जाते. या व्यतिरिक्त, तुम्ही लॅव्हेंडर चहा किंवा लॅव्हेंडर इसेंशियल ऑइल वापरून स्वतःला चिंतामुक्त आणि आरामशीर ठेवू शकता.

गल्फेमिया ग्लॉका

गॅल्फिमिया ग्लॉका वनस्पती मेक्सिकोच्या मूळ प्रजातींमध्ये गणली जाते. अँक्झायटीपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक लोक वर्षानुवर्षे या वनस्पतीचा वापर करत आहेत. अशा परिस्थितीत गॅल्फिमिया ग्लॉकाच्या मदतीने तुम्ही स्वतःला अँक्झायटी आणि स्ट्रस फ्री ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT