Benefits Of Matsyasana esakal
लाइफस्टाइल

Benefits Of Matsyasana : मत्स्यासनाचा सराव केल्याने श्वसनाच्या समस्यांपासून मिळेल आराम, जाणून घ्या फायदे आणि पद्धत

Benefits Of Matsyasana : संशोधकांना असे आढळून आले आहे की, जर योगासनांचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश केला, तर अनेक प्रकारच्या आजारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Matsyasana : नियमितपणे योगा, व्यायाम केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. योगा, व्यायाम यांच्या जोडीला संतुलित आहार देखील महत्वाचा आहे. या दोन्ही गोष्टींचे व्यवस्थित संतुलन राखले गेले की, आरोग्य निरोगी राहते. योगासनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश आढळून येतो.

या विविध आसनांचे आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. शारिरीक समस्यांपासून आराम मिळवण्यासोबतच आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. संशोधकांना असे आढळून आले आहे की, जर योगासनांचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश केला तर अनेक प्रकारच्या आजारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते.

या योगासनांपैकी एक असलेले मत्स्यासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. चला तर मग आज आपण मत्स्यासन हे योगासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घेणार आहोत.

मत्स्यासन योगासन करण्याची योग्य पद्धत

  • मत्स्यासन या योगासनाला फिश पोझ असे ही म्हटले जाते.

  • हे योगासन करताना सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा.

  • त्यानंतर, तुमचे पाय पद्मासनाच्या मुद्रेत आणा. त्यानंतर, तुमच्या दोन्ही मांड्या आणि गुडघे जमिनीवर समांतर ठेवून दीर्घ श्वास घ्या आणि छाती वर उचला.

  • आता तुमच्या डोक्याचा वरचा भाग जमिनीवर ठेवा. काही काळ या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल.

  • आता हळूहळू श्वास सोडा आणि सामान्य स्थितीमध्ये परत या.

मत्स्यासन योगासन करण्याचे फायदे

  • फुफ्फुसांना ताण देण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी हे योगासन अतिशय प्रभावी आहे.

  • ताण-तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे.

  • या योगासनाचा नियमित सराव केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

  • दम्याची लक्षणे कमी करण्यासाठी आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन उपयुक्त ठरते.

  • जर तुम्हाला पाठदुखी आणि कंबरदुखीची समस्या असेल तर या योगासनाचा दररोज सराव करा. यामुळे, तुम्हाला पाठदुखीपासून आणि कंबरदुखीपासून आराम मिळेल.

    डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT