nail extensions esakal
लाइफस्टाइल

Nail Extensions : नेल एक्सटेंशन कसे केले जाते ? नेल एक्सटेंशन केल्यानंतर अशी घ्या काळजी

आजकाल तरूणींमध्ये नेल आर्ट, नेल एक्सटेंशन करण्याची चांगलीच क्रेझ आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nail Extensions Care Tips : आपल्या हातांची नखे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये भर घालतात. त्यामुळे, नखांची काळजी घेऊन त्यांचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. आजकाल तरूणींमध्ये नेल आर्ट, नेल एक्सटेंशन करण्याची चांगलीच क्रेझ आहे. नेल आर्टमध्ये अनेक प्रकारच्या क्लासी डिझाईन्स देखील तरूणाईला भुरळ घालत आहेत.

नेल एक्सटेंशन करण्यासाठी थोडे फार पैसे खर्च होतात. मात्र, नेल एक्सटेंशन केल्यानंतर नखांची योग्य ती काळजी घ्यावी लागते. कारण, जर त्यांची काळजी घेतली गेली नाही तर नखे तुटण्याची शक्यता असते.

आज आपण नेल एक्सटेंशन कसे केले जाते ? आणि नेल एक्सटेंशन केल्यानंतर नखांची काळजी नेमकी कशी घ्यावी ? याबद्दल जाणून घेणार आहोत.

नेल एक्सटेंशन कसे केले जाते ?

सर्वात आधी नेल एक्सटेंशन कसे केले जाते, याबद्दल आपण जाणून घेऊ. नेल एक्सटेंशन करताना सर्वात आधी तुमच्या खऱ्या नखांना एक प्रकारे फाईल केले जाते.

आता फाईल करणं म्हणजे तुमची नखे आणि त्याच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करून घेणे. त्यानंतर, नखांना लावण्यासाठी जो एक खास ग्लू असतो, त्याच्या मदतीने तुमच्या नखांवर अ‍ॅक्रोलिक नेल्स चिटकवले जातात.

नखांना शेप दिला जातो. त्यानंतर, तुम्ही या नखांवर तुमच्या आवडीचे नेलपेंट लावू शकता. जसे की, मॅट, ग्लिटर किंवा जेल कोटिंग या प्रकारातील नेल पेंट लावू शकता. त्यानंतर, एका मशिनच्या मदतीने ही नखे सेट केली जातात.

नेल एक्सटेंशन केल्यानंतर नखांची काळजी कशी घ्याल ?

मॅनिक्युअर करू नका

नेल एक्सटेंशन केल्यानंतर मॅनिक्युअर करू नका. जर तुम्ही चुकून जरी नेल एक्सटेंशन केल्यानंतर मॅनिक्युअर केलं तर तुमची नखे तुटू शकतात.

कपडे धुवू नका

काही महिला नेल एक्सटेंशन केल्यानंतर लगेच घरातील कामाला सुरूवात करतात. जसे की कपडे धुतात. मात्र, असं अजिबात करू नका. नेल एक्सटेंशन केल्यानंतर अजिबात कपडे धुवू नका. कारण, कपडे धुताना तुमची नखे त्या कपड्यांमध्ये अडकून तुटू शकतात. यामुळे तुमच्या हातांना इजा होऊ शकते.

भांडी घासू नका

नेल एक्सटेंशन केल्यानंतर लगेच भांडी घासू नका. कारण, भांडी घासताना तुमची नखे तुटू शकतात. तसेच, नखांना इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे, नेल एक्सटेंशन केल्यानंतर लगेच भांडी घासू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

SCROLL FOR NEXT