Vrikshasana Benefits esakal
लाइफस्टाइल

Vrikshasana Benefits : पाठदुखीने त्रस्त आहात? मग, दररोज करा वृक्षासनाचा सराव, जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

Vrikshasana Benefits : जर तुम्ही योगाभ्यास करायला सुरूवात करणार असाल तर, सोप्या योगासनांचा सराव करण्यावर भर द्या.

Monika Lonkar –Kumbhar

Vrikshasana Benefits : नियमित योगा करणे, हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी योगा आपली मदत करतो. परंतु, योगासनांचा सराव करताना, एखादी योग मुद्रा किंवा श्वास घेण्याचा मार्ग चुकीच्या पद्धतीने केल्यास तुमच्या आरोग्याला हानी पोहचू शकते. त्यामुळे, योगासने करताना ती योग्य आणि अचूक पद्धतीने करण्याचा सराव करा.

शक्यतो सहज आणि सोपी योगासने करण्यावर भर द्या. जर तुम्ही योगाभ्यास करायला सुरूवात करणार असाल तर, सोप्या योगासनांचा सराव करा. या सोप्या योगासनांमध्ये वृक्षासनाचा समावेश होतो. या वृक्षासनाला इंग्रजीमध्ये ट्री पोझ असे ही म्हटले जाते.

या योगासनाच्या नावावरूनच हे स्पष्ट होते की, या योगासनामध्ये आपल्या शरीराची स्थिती ही झाडाप्रमाणे ताठ असते आणि झाडाप्रमाणे आपल्याला संतुलन देखील राखावे लागते. वृक्षासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आज आम्ही तुम्हाला वृक्षासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे सांगणार आहोत.

वृक्षासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • वृक्षासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे रहा.

  • आता तुमचा उजवा गुडघा वाकवून तो पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा.

  • आता तुमचा डावा पाय सरळ ठेवून शरीर संतुलित आणि स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • आता तुमचे दोन्ही हात डोक्याच्या वरच्या दिशेने न्या आणि नमस्काराच्या स्थितीमध्ये ताठ ठेवा.

  • आता काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

  • त्यानंतर, श्वास सोडा आणि सामान्य स्थितीमध्ये परत या.

  • हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. परंतु, जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच, योगातज्ज्ञांची मदत घ्या.

वृक्षासनाचे फायदे खालीलप्रमाणे

  • वृक्षासनाचा सराव नियमितपणे केल्याने पाय, पायाचे घोटे, आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

  • या योगासनाच्या सरावामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.

  • दररोज या योगासनाचा सराव केल्याने पाठदुखी आणि कंबरदुखी दूर होण्यास मदत होते. तसेच, पाठीचा कणा मजबूत होतो.

  • वृक्षासनाचा नियमितपणे सराव केल्याने सायटिकाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

  • मानसिक आणि शारिरीक संतुलन सुधारण्यासाठी वृक्षासन अतिशय फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT