coconut sakal
लाइफस्टाइल

Coconut: कधी पाणी जास्त हवं असतं तर कधी मलई, या आहेत योग्य नारळ विकत घ्यायच्या टिप्स

उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

सकाळ डिजिटल टीम

नारळाचे पाणी उन्हाळ्यात पिणे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे ते आपली तहान भागवण्यासाठी तर प्रभावी मानले जाते. तसेच नारळाचे पाणी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.

आपण नारळाचे पाणी पिण्यासाठी अनेकदा कुठल्या ना कुठल्या गाडीमालकाकडून नारळ घेतो, मात्र खूप वेळा असे होते की त्यामध्ये पाणी खूप कमी असते, आपण त्यामुळे अस्वस्थ होतो. तुम्हाला आम्ही आज अशा अनेक टिप्स सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही चांगला नारळ निवडू शकता.

या आहेत नारळ पाणी विकत घेण्याच्या टिप्स

सगळ्यात पहिले म्हणजे विकत घेताना नारळाचा रंग लक्षात ठेवा. तुम्ही ज काही नारळ विकत घ्याल, तो हिरवा आणि दिसायला ताजा पाहिजे. नारळ जितका हिरवागार आहे, तितकाच त्याचा अर्थ नुकताच झाडावरून तोडला गेला आहे.

नारळामध्ये अशा वेळी पाण्याचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असते. तसेच नारळाचा रंग तपकिरी, पिवळा-हिरवा आणि हिरवा-तपकिरी असेल तर तो विकत घेऊ नका. या प्रकारच्या नारळात पाणी कमी आणि मलई जास्त असते.

मोठा नारळ जास्त पाणी तयार करतो ?

महत्वाची गोष्ट म्हणजे नारळ विकत घेताना मोठ्या नारळात जास्त पाणी असते, हा विचार करू नका. नारळाच्या पाण्याचे क्रीममध्ये रूपांतर होऊ लागल्यावर त्याचा आकार थोडासा वाढतो. तसेच त्याची सालही कडक होते. यामुळे त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते. म्हणूनच मोठ्या आकाराच्या नारळाऐवजी मध्यम आकाराचा नारळ विकत घ्यावा. असे नारळ घेण्यास उशीर करू नका.

कानाजवळ नारळ घेऊन जोरजोरात हलवावे. नारळामध्ये पाण्याचा आवाज येत असेल तर तो घेऊ नका. पाण्याचा आवाज आला की त्याचा अर्थ त्या नारळात मलई तयार होऊ लागली आणि आत मधले पाणी कमी होऊ लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT