gas cylinder sakal
लाइफस्टाइल

Gas Cylinder: काय सांगता! एका टॉवेलमुळे समजेल सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक, ही आहे ट्रिक

आता तुम्ही केवळ एक टॉवेल वापरून सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकता.

Aishwarya Musale

घरांमध्ये जेवण शिजवण्यासाठी गॅस सिलिंडरचा उपयोग केला जातो. यावर जेवण बनवणे सोईस्कर पडते. पण अनेकवेळा जेवण बनवताना सिलिंडरमधील गॅस संपतो. आणि असं काही झाल्यावर घरी दुसरा भरलेला सिलिंडर नसला तर खूप गडबड होऊन बसते. पण तुम्हाला माहित आहे का केवळ एक टॉवेल वापरून सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकता.

एका ओला टॉवेल तुमची खूप मदत करू शकतो. हे तपासण्यासाठी की सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे. एक ओला टॉवेल खूप प्रभावी ठरू शकतो. असे केल्याने तुम्हाला आधीच समजेल की तुमचा गॅस लवकर संपणार आहे की नाही.

सिलिंडरमधील गॅस तपासण्यासाठी ओल्या टॉवेलचा असा करा उपयोग :

सर्वप्रथम एक ओला टॉवेल घ्या आणि तो सिलिंडरच्या भोवती गुंडाळा. जेव्हा सिलिंडरची टाकी ओली होईल तेव्हा तो टॉवेल बाजूला काढून ठेवा. त्यांनतर टाकीचे निरीक्षण करा आणि बघा की टाकीचा कोणता भाग लवकर वाळत आहे, आणि कोणता भाग जास्त वेळ ओला राहतो.

असे केल्याने तुम्हाला सिलिंडरच्या टाकीवरील ओला आणि सुका भाग सिलिंडरमधील गॅसची लेव्हल सांगतो. आता तुम्ही म्हणाल याने कसं कळणार गॅस संपला आहे कि नाही. याचा अर्थ असा की जो टाकीचा भाग लवकर कोरडा झाला आहे तेथे गॅस शिल्लक नाही किंवा तो संपला आहे. आणि गॅसचा जो भाग ओला राहतो त्या लेव्हलपर्यंत गॅस शिल्लक आहे असे समजावे.

तुम्हाला माहित आहे का घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये काही प्रमाणात लिक्विड देखील असते. तसेच सिलिंडरच्या जेवढ्या भागात गॅस आहे, तेवढा भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि तो लवकर वाळत नाही. पण ज्याभागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा देखील होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT