Home-Remedies For Dandruff Sakal
लाइफस्टाइल

Home-Remedies For Dandruff: महागडे शॅम्पू अन् तेल वापरूनही कोंडा कमी झाला नसेल तर वापरा 'हे' घरगुती उपाय

Home-Remedies For Dandruff: तुम्हालाही केसांमधील कोंडा कमी करायचा असेल तर घरगुती उपाय वापरू शकता.

Puja Bonkile

how to get dandruff free hair home remedies

केसांच्या टाळूमध्ये जमा झालेला कोंडा नेहमी स्नो फॉलसारखा पडत राहतो. या समस्येने अनेक लोक त्रस्त असतात. कोरड्या टाळू आणि डोक्यातील कोंडा या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल. चला तर मग जाणून घेऊया कोंडा कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे.

लिंबू आणि खोबरेल तेल

कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी खोबरेल तेल आणि लिंबाचा रस वापरू शकता. हे दोन्ही पदार्थ मिक्स करून केसांना लावावे. 15 ते 20 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवावे. यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या कमी होते.

कडुलिंबाची पाने

केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता. यासाठी कडुलिंबाची पाने उकळून त्याची पेस्ट तयार करावी. या पानांची पेस्ट थंड करून केसांच्या मुळात मसाज करावी. केस चांगले सुकल्यानंतर केस शॅम्पूने धुवा. या उपायाने कोंडा कमी होतो.

दही

केसांमधील कोड्यांची समस्या दूर करण्यासाची दही वापरू शकता. यासाठी दही, मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण बनवावे. ही पेस्ट केसांना लावून मसाज करावी. नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवावे. असे आठवड्यातून दोनदा करावे. यामुळे कोंड्याची समस्या कमी होते

कोरफड जेल

कोरफड जेल त्वचेसह केसांसाही फायदेशीर असते. केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी कोरफड जेल वापरू शकता. यामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो. यासाठी कोरफड जेलने केसांमध्ये मसाज करावी आणि 15 ते 20 मिनिटांनंतर केसांना स्वच्छ धुवावे.

मेथी दाणा

मेथी दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी केसांना लावावे. १५ ते २० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवावे. असे आठवड्यातून दोनदा करावे. यामुळे केसांमदील कोंडा कमी होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

Matcha Drink : इन्स्टाग्रामपासून घराघरांत पोहोचले माचा! ‘हिरव्या माचा’ची देशभरात क्रेझ; गुगल सर्चमध्ये १३०० टक्क्यांची वाढ

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Maharashtra Weather Update : राज्यात १२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा कायम पावसाला पोषक वातावरण

SCROLL FOR NEXT