Ration card online  esakal
लाइफस्टाइल

Ration Card Online : तासनतास रांग लावा, एजंटला पैसे द्या...आता बास! घरबसल्या मोफत मिळवा रेशन कार्ड

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १८ : रेशनकार्ड (शिधापत्रिका) हवी आहे. त्यासाठी रेशन कार्यालयात जाण्याची, तेथे एजंटला धरून पैसे खाऊ घालण्याची गरज नाही. कारण, रेशन कार्ड हवे असल्यास ते आता ऑनलाइन आणि निःशुल्क (मोफत) उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अनेक तहसील कार्यालयांमध्ये तसेच परिमंडळ कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला होता. त्यात अनेक अधिकारी देखील सामील होते. त्यामुळे वीस रुपयात मिळणाऱ्या रेशन कार्डसाठी एक ते दोन हजार रुपयांपर्यंत मोजावे लागत होते. याला आता आळा बसणार आहे. राज्य सरकारने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले. अर्जदार हा नेमका कुठल्या प्रकारातील आहे, यावरून त्याचे रेशन कार्ड किती दिवसात मिळेल हे ठरणार आहे.

यावर रेशन कार्ड दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी म्हणाले, ‘‘रेशन कार्ड काढण्यासाठी पूर्वी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसह एजंटांची लॉबी होती. या सुविधेमुळे ही लॉबी तुटणार आहे.’’

या कालावधीत मिळणार कार्ड

जर अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असल्यास पूर्वीप्रमाणेच त्यासाठी रेशन अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करावा लागणार आहे. त्यामुळे असे रेशन कार्ड देताना पूर्वीचीच २० दिवसांची मुदत असणार आहे. पांढरे रेशन कार्ड काढायचे असल्यास त्याला पूर्वी सात दिवस लागायचे, आतादेखील याच मुदतीत ते कार्ड मिळणार आहे. रेशन कार्ड मान्य झाल्यानंतर त्याला ते ऑनलाइनच डाउनलोड करता येणार आहे. त्यात त्याचे कार्ड कोणत्या दुकानदाराला नेमण्यात आलेला आहे. याचादेखील उल्लेख असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT