Nagpur news Are you suffering from mosquitoes Then plant these trees at home and repel mosquitoes 
लाइफस्टाइल

Mosquito Repellent : डास पळवण्यासाठी आता महागडे कॉईल आणि रिफिलची गरज नाही; करा 'हे' घरगुती उपाय

डास चावल्याने चिकनगुनिया, डेंग्यू आणि मलेरियासारखे गंभीर आजार होऊ शकतात.

वैष्णवी कारंजकर

उन्हाळ्यात डासांचा त्रास खूप वाढतो. डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक बाजारातून रसायनावर आधारित कॉइल आणि रिफिल आणतात. अनेक वेळा हे सर्व डासांवरही कुचकामी ठरतात. अशा परिस्थितीत डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि नैसर्गिक गोष्टींची मदत घेऊ शकता.

डास चावल्याने चिकनगुनिया, डेंग्यू आणि मलेरियासारखे गंभीर आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही डासांना दूर करण्यासाठी काही सोप्या पद्धती वापरून पाहू शकता. याविषयी जाणून घेऊया.

डासांना पळवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचा वापर करू शकता. कडुलिंबाचे तेल केवळ डासांना दूर ठेवण्यास मदत करत नाही तर ते हर्बल देखील आहे. अशावेळी डास मारण्यासाठी कडुनिंबाची पाने आणि काड्या धुवून, पाणी कोरडे करून उकळल्यानंतर ते खोबरेल तेलात मिसळावे. दहा मिनिटे शिजल्यानंतर हे तेल गाळून घ्या. नंतर थंड करून बाटलीत भरून ठेवा. जेव्हा तुम्हाला डासांपासून सुटका हवी असेल तेव्हा हे तेल त्वचेला लावा.

पेपरमिंट ऑइलच्या मदतीने तुम्ही घराला डासांपासूनही मुक्त ठेवू शकता. यासाठी पेपरमिंट ऑइलमध्ये खोबरेल तेल मिसळा आणि बाटलीत भरा. आता हे तेल रोज त्वचेला लावा. डासांना पेपरमिंटच्या वासापासून दूर राहणे आवडते. ज्यामुळे ते तुमच्या आजूबाजूला फिरकत नाहीत.

लिंबू निलगिरी तेलाचा वापर डासांना पळवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यासाठी दहा मिली लिंबू निलगिरी तेलात ९० मिली ऑलिव्ह ऑईल मिसळून स्प्रे बाटलीत भरून ठेवा. त्यानंतर हे तेल गरजेच्या वेळी त्वचेवर लावा. यासोबतच हे मिश्रण तुम्ही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडू शकता. यामुळे घरातून डास लगेच नाहीसे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT