lifestyle sakal
लाइफस्टाइल

मानेवरचा काळपटपणा दुर होईल फक्त १० रुपयात, कसं ते वाचा

अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळंही मानेवर टॅन जमा होतो.

सकाळ डिजिटल टीम

सुंदर कोणाला दिसायचं नाहीये? सगळ्यांनाच आपण सुंदर दिसावं असं वाटतं असतं.. आणि अनेकदा आपण त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, कधी मुलतानी माती तर कधी बेसनाच पीठ कधी साय तर कधी गुलाबपाणी पण चेहऱ्याच सौंदर्यच पूर्णपणे सौंदर्य असतं का तर नाही.. अनेकदा चेहरा किंवा कपडे खूप सुंदर दिसतात पण काही काळवंडलेल्या शरीराच्या भागामुळे अनेकदा संकोचल्या सारखं होत, चेहरा सुंदर पण मान काळवंडलेली असं असल्याने सौंदर्यात फरक पडतो. (how to get rid off black patches on neck check here home remedies)

मान हा शरीराचा एक असा भाग आहे, जो नियमित स्वच्छ न केल्यास तो काळवंडण्यास सुरुवात होते. मानेवर Dead Skin जमल्यामुळं ती काळी पडण्यास सुरुवात होते. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळंही मानेवर टॅन जमा होतो. यासाठी सध्या अनेक स्क्रब आणि इतर साहित्य उपलब्ध आहेत. पण, त्यानंही काहीजणांना फरक पडत नाही. अशावेळी मग घरच्या घरी असणाऱ्या साहित्याकडे मोर्चा वळवला जातो.

चला तर जाणून घेऊया घरगुती उपाय-

असेच काही घरगुती उपाय :-

तांदळाचे पीठ

काळवंडलेपणा कमी करण्यासाठी तांदळाचं पाणी आणि तांदळाची पेस्ट बरीच मदत करते. तांदळापासून मान स्वच्छ करण्यासाठी झोपण्यापूर्वी तांदूळ पाण्यात भिजवा आणि सकाळी उठल्यानंतर ते वाटून घ्या. या तांदळाच्या पेस्टमध्ये 1 विटामिन-ई कॅप्सूल आणि 1 चमचा कॉफी मिसळा. हे मिश्रण मानेवर लावा आणि 10 मिनिटं ठेवा, त्यानंतर धुवून स्वच्छ करा. यानंतर मानेवर हलक्या हातानं moisturizer लावा. असं केल्यास मानेचा काळवंडलेपणा कमी होईल.

या गोष्टींची काळजी घ्या

एक गोष्ट लक्षात घ्या, की हे मिश्रण मानेवर जोरजोरात चोळू नका. असं केल्यास मानेवरील त्वचेला इजा पोहोचेल. हे मिश्रण मानेवर जास्त वेळ सुकून देऊ नका. शिवाय केसांच्या (Hairs) संपर्कातही हे मिश्रण न आलेलंच बरं. कारण ते केसात अडकल्यास काढताना बऱ्याच अडचणी येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT