Mira Rajput  sakal
लाइफस्टाइल

Mira Rajput Saree Collection: पार्टीमध्ये रॉयल आणि क्लासी दिसायचंय? मग मीरा राजपूतचे हे साडी लुक करा फॉलो

आम्ही तुमच्यासोबत मीरा राजपूत कपूरचे साडीचे कलेक्शन शेअर करणार आहोत.

Aishwarya Musale

सुप्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर बॉलीवूडशी संबंधित नसली तरी तिचा फॅशन सेन्स बॉलीवूडच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकतो. तिच्या फॅशनचा एक्स फॅक्टर म्हणजे तिचा रॉयल आणि क्लासी लूक.

विशेषतः तिने साडी नेसली तर तिची स्टाइल पाहण्यासारखी असते. येथे आम्ही तुमच्यासोबत मीरा राजपूत कपूरचे साडीचे कलेक्शन शेअर करत आहोत, जे पाहून तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये क्लासी आणि रॉयल साड्या देखील समाविष्ट करू शकता.

या निळ्या साडीत मीरा राजपूत राजकुमारीसारखी दिसत आहे. ऑर्गेन्झा आणि सिल्क बेस असलेल्या या इंडिगो साडीमध्ये जरदोजी आणि गोल्डन सिल्व्हर वर्कसह सुंदर फुलांची डिझाईन केलीआहे. मीरा या साडीत जितकी स्टायलिश आहे तितकीच क्लासी दिसत आहे.

मीराने केसांचे पोनीटेल बनवले आहे आणि गळ्यात कुंदन चोकर घातला आहे. एका हातात बांगडी आणि दुसऱ्या हातात पोतली डिझाईनची पर्स तिला परफेक्ट बनवत आहे.

Mira Rajput

येथे मीराने आयव्हरी रंगाची सुंदर साडी नेसली असून त्यावर रेशम आणि डोरीचे काम केले आहे. तिने या प्री-ड्रेप केलेल्या साडीसोबत आयव्हरी रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे आणि तिचा लूक साधा ठेवला आहे. लूक रॉयल दिसण्यासाठी कानात हेवी मोत्याचे झुमके घालण्यात आले असून केस मोकळे ठेवण्यात आले आहेत. जर तुम्ही दिवसा पार्टीत जाणार असाल तर तुम्ही असा लुक तयार करू शकता.

Mira Rajput

मीराने येथे लेहेंगा स्टाइलची साडी परिधान केली आहे. या काळ्या रंगाच्या नेट साडीसोबत मीराने स्लीव्हलेस आणि फुल बॉडी टॉप स्टाइलचा ब्लाउज कॅरी केला आहे. तुम्ही पार्ट्यांमध्ये ही सिक्वेन्स्ड साडी सहजपणे नेसून पार्टीचा आनंद लुटू शकता.

Mira Rajput

या पिवळ्या रंगाच्या सिल्क साडीत मीरा एकदम रॉयल दिसत आहे. मीराने ही उत्कृष्ट दिसणारी साडी घातली असून तिच्या गळ्यात स्टोन वर्कचा हार आणि कानात मॅचिंग टॉप्स आहेत. मीराने मोकळे केस आणि मॅचिंग कट-स्लीव्ह ब्लाउजने तिचा लूक सिम्पल ठेवला आहे. हा लुक तुम्ही कोणत्याही फॅमिली गेट टूगेदर किंवा सणांमध्ये स्टाइल करू शकता.

Mira Rajput

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT