Beetroot Cutlet Recipe esakal
लाइफस्टाइल

Beetroot Cutlet Recipe : नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी बीटरूट कटलेट, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी

Beetroot Cutlet Recipe : शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट अतिशय लाभदायी आहे. बीटापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Beetroot Cutlet Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज काय खावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. बरं ते पोहे, उपमा, इडली, डोसा आणि शिरा खाऊन अनेकांना कंटाळा येतो. काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खावं, असे प्रत्येकाला वाटते. बीट खायला तर आपल्या सगळ्यांनाच आवडते. बीटरूट हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? हे देखील सगळ्यांना माहित आहे.

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट अतिशय लाभदायी आहे. बीटापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. बीटाचा ज्यूस, बीटाचे सॅलेड यासोबतच विविध प्रकारच्या रेसिपी देखील बीटापासून बनवल्या जातात. आज आपण नाश्त्यासाठी बीटाचे स्वादिष्ट कटलेट कसे बनवयाचे? त्याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

बीटाचे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • उकडलेले बटाटे २

  • बीट १

  • १ गाजर बारीक चिरून उकडलेले

  • ब्रेड क्रंम्ब्स अर्धा कप

  • लाल तिखट १ चमचा

  • चाट मसाला १ चमचा

  • कोथिंबीर चिरलेली

  • चवीनुसार मीठ

  • कॉर्नफ्लोअर २ चमचे

  • काळी मिरी – अर्धा चमचा

  • चवीनुसार मीठ

  • तळण्यासाठी तेल

बीटाचे कटलेट बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्या.

  • त्यानंतर, बीट धुवून घ्या, त्याचे साल काढून बारीक किसून घ्या किंवा चिरून घ्या.

  • हे चिरलेले बीट बटाट्याच्या मिश्रणात मिसळा.

  • आता या मिश्रणात उकडलेले गाजर, वाटाणा, शिमला मिरची अशा आवडत्या भाज्या घाला.

  • त्यानंतर, त्यात लाल तिखट, चाट मसाला, मीठ, काळी मिरी घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

  • आता या मिश्रणाचे गोळे बनवा किंवा तुम्हाला हव्या ते आकाराचे कटलेट बनवा.

  • त्यानंतर, कॉर्नफ्लोअरमध्ये थोड पाणी मिसळून त्याची स्लरी तयार करा.

  • आता या स्लरीमध्ये कटलेट्स बुडवा आणि ब्रेड क्रंम्ब्समध्ये बुडवा.

  • त्यानंतर, एका बाजूला गॅसवर पॅन किंवा कढई गरम करायला ठेवा.

  • त्यात तेल घालून मंद आचेवर हे बीट कटलेट्स सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

  • तुमचे हेल्दी आणि टेस्टी बीट कटलेट्स तयार आहेत.

  • हे कटलेट्स टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT