Beetroot Dosa Recipe esakal
लाइफस्टाइल

Beetroot Dosa Recipe : नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी गुलाबी डोसा, पोट ही भरणार अन् चवदारही होणार!

Beetroot Dosa Recipe : हा बीटरूट डोसा केवळ दिसायला गुलाबी नाही तर चवीला देखील उत्तम लागतो. शिवाय, हा बीटापासून बनवलेला डोसा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Beetroot Dosa Recipe : साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करायला सगळ्यांनाच आवडतो. या दाक्षिणात्य खाद्यपदार्थांमध्ये इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे इत्यादी पदार्थांचा वापर नाश्त्यामध्ये हमखास केला जातो. परंतु, तुम्ही कधी गुलाबी डोसाबद्दल ऐकले आहे का? हा गुलाबी डोसा आहे बीटरूट डोसा, जो बीटपासून बनवला जातो. ज्यामुळे, त्याला गुलाबी डोसा म्हणून ही ओळखले जाते.

हा बीट डोसा केवळ दिसायला गुलाबी नाही तर चवीला देखील उत्तम लागतो. शिवाय, हा बीटापासून बनवलेला डोसा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हा डोसा बनवण्यासाठी बीटरूटचा रस वापरला जातो. बीटाचे सेवन केल्याने शरीरात रक्त वाढण्यास मदत होते, त्यासोबत इतर अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्याची सुरूवात हेल्दी आणि चविष्ट करायची असेल तर, तुम्ही हा बीटरूट डोसा बनवू शकता. हा बनवायला देखील अतिशय सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊयात या बीटरूट डोसाची रेसिपी.

बीटरूट डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे (Materials required) :

  • तांदूळ – ३ कप

  • उडदाची डाळ – १ कप

  • बीटरूट – १ कप

  • बेकिंग सोडा – १ चमचा

  • लाल तिखट – १ चमचा

  • हिंग – चिमूटभर

  • जिरे – अर्धा चमचा

  • तेल

  • मीठ चवीनुसार

बीटरूट डोसा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे (The right way to make Beetroot Dosa)

  • सर्वात आधी उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर, हे दोन्ही घटक रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

  • त्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ आणि उडीद डाळमधील जास्तीचे पाणी काढून टाका. त्यानंतर, त्याची मिक्सरला बारीक पेस्ट तयार करा.

  • आता हे डोसाचे तयार झालेले पीठ एका बाऊलमध्ये काढून ठेवा.

  • त्यानंतर, मिक्सरच्या भांड्यात बीटाचे तुकडे, जिरे आणि त्यात थोडे लाल तिखट घालून याची बारीक पेस्ट तयार करा.

  • आता ही बीटरूटची पेस्ट डोसाच्या तयार मिश्रणात मिसळा आणि हे बॅटर चांगले मिसळून घ्या. आता तुमचे बीटरूट डोसाचे बॅटर तयार आहे. या पीठाला आता गुलाबी रंग आला असेल.

  • त्यानंतर, दुसऱ्या बाजूला गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा.

  • त्यावर तेल पसरून घ्या. आता चमच्याच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने डोसाचे पीठ तव्यावर पसरून घ्या.

  • हा बीटरूट डोसा आता दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.

  • आता तुमचा क्रिस्पी डोसा तयार आहे.

  • हा गरमागरम डोसा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT