Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी मुलांना जरूर शिकवा ‘या’ गोष्टी

मुलांनी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत असणे हे फार महत्वाचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Parenting Tips : आयुष्यात प्रत्येक व्यक्ती भावनिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर असणे हे फार महत्वाचे आहे. कारण, या २ महत्वपूर्ण गोष्टींमुळे तुमच्या व्यक्तिमत्वावर वेगळाच प्रभाव पडतो. जर तुम्हाला या गोष्टींवर नियंत्रण मिळवणे जमले नाही तर मग आयुष्यात तुमची गाडी पुढे जाणार नाही. अशा स्थितीमध्ये या दोन्ही गोष्टींचा तुमच्या भविष्यावर आणि यशावरही परिणाम होतो.

थोडक्यात काय तर आयुष्यात तुम्ही यशस्वी असण्यासोबत मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत असणे हे फार महत्वाचे आहे. यासाठी लहान मुलांना सुरूवातीपासूनच या गोष्टी शिकवणे आणि समजून सांगणे हे पालकांचे कर्तव्य आहे.

आज आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना मेंटली स्ट्रॉंग करण्यासाठी सांगणे आणि शिकवणे महत्वाचे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

भावना व्यक्त करायला शिकवा

तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करायला शिकवणे हे फार महत्वाचे आहे. जर मुलांनी त्यांच्या भावना स्वत:च्या मनातच दाबून ठेवल्या तर याचा मुलांवर दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी दु:खी असेल तर ते स्वत:च्या मनातच त्या भावना दडवतात हे चुकीचे आहे.

मुलांना राग आल्यानंतर ही मुले त्यांच्या भावना व्यक्त करत नाही, त्या मनातच दडवतात आणि मग कधीतरी याचा विस्फोट होतो. परंतु, तोपर्यंत याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झालेला असतो, त्यामुळे, मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करायला शिकवा.

मुलांचे म्हणणे ऐकून घ्या

मुलांनी पालकांजवळ प्रत्येक गोष्ट शेअर करावी असे प्रत्येक पालकांना वाटते. मात्र, तुमच्या मुलांनी तुमच्याजवळ येऊन एखादी गोष्ट शेअर करावी, एवढा विश्वास मुलांचा तुमच्यावर असणे आणि तो निर्माण होणे हे फार महत्वाचे आहे.

जेव्हा हा विश्वास मुलांच्या मनात तयार होतो, तेव्हा मुले त्यांच्या मनातील चिंता, इच्छा आणि बऱ्याच गोष्टी पालकांसोबत मोकळेपणाने शेअर करतात. त्यामुळे, मुलांचे म्हणणे पालकांनी ऐकून घ्यायला हवे.

पालक मुलांना योग्य मार्ग दाखवू शकतात, यामुळे मुलांच्या मनावरचे ओझे दूर होईल आणि त्यांना अडचणींच सामना करायला सोपे जाईल.

सकारात्मक गोष्टी शिकवा

पालकांनी मुलांना सकारात्मक व्हायला शिकवणे, हे फार महत्वाचे आहे, आणि या गोष्टी शिकवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. जर तुमच्या मुलांना कोणत्याही छोट्या-मोठ्या गोष्टीची भीती वाटत असेल, तर त्याच्या मनातून ती भीती घालवणे आणि मुलांना सकारात्मक व्हायला शिकवणे हे पालकांनी करायलाच हवे.

ज्यामुळे, मुलांना सकारात्मक होऊन प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणे, हे सोपे होऊन जाईल. या सर्व गोष्टी मुले पालकांकडूनच शिकतात. त्यामुळे, पालकांनी देखील सकारात्मक असणे हे फार महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT