Thick Eyebrow Beuty Tips esakal
लाइफस्टाइल

Thick Eyebrow Beuty Tips : सोनाक्षी, करीनासारख्या दाट-काळ्या आयब्रो हव्यात? या ट्रिक्स ट्राय करा

चेहऱ्याला उठावदार बनवणाऱ्या भुवयांचा आकार, जाडी, दाटपणा याचा तुमच्या लूकवर फार परिणाम होतो.

सकाळ डिजिटल टीम

How to make Eyebrow Black and Thick :  चेहऱ्याला उठावदार बनवणाऱ्या भुवयांचा आकार, जाडी, दाटपणा याचा तुमच्या लूकवर फार परिणाम होतो. म्हणूनच महिला भुवयांचं सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळे पर्याय ट्राय करत असतात. काही महिलांच्या भूवया पातळ आणि अखुड असतात. त्या दाट करण्यासाठी महिला बरेच महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. पण तरीही फारसा फरक पडत नाही. पण काही अगदी सोपे, स्वस्त आणि साधे उपाय आहेत जे तुम्हाला परिणाम नक्कीच दाखवू शकतात.

ऑलिव्ह ऑइल - आयब्रोची ग्रोथ वाढवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलची मदत घेऊ शकतात. रोज रात्री झोपण्या आधी भुवयांवर हे तेल लावा. ५-१० मिनीट हलक्या हाताने मसाज करा. यामुळे १५ दिवसातच फरक दिसेल.

एलोवेरा जेल - भुवयांचं सौंदर्य वाढवण्यासाठी एलोवेरा जेलचा वापरही उत्तम ठरतो. बोटांवर हे जेल घेऊन त्याने भुवयांवर हलकासा मसाज करा. दिवसातून २ वेळा रोज हे केल्याने आयब्रो काळ्या आणि दाट होतील.

कच्च दूध - काळ्या आणि चमकदार भुवयांसाठी कच्च दूध फार मदतशीर ठरतं. कॉटनच्या मदतीने दूध आयब्रोवर लावा. दिवसातून एकदा हा उपाय केल्याने भुवया काळ्या आणि शायनी बनतील.

खोबऱ्याचं तेल - खोबऱ्याचं तेल भुवयांसाठी बेस्ट ब्युटी ट्रिटमेंट ठरते. हातावर खोबऱ्याचं तेल घेऊन ते भुवयांवर लावा. दिवसातून दोन वेळा हा उपाय केला तर आयब्रो जाड आणि काळ्या होतात.

कांद्याचा रस - भुवयांचा ग्रोथ रेट वाढण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर करू शकतात. रोज हा रस लावला तर आयब्रो काळ्या आणि दाट होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Accident: बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; टिप्परच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांचा वाढला दबदबा; जानेवारीत ई-कार, दुचाकींच्या मागणीत वाढ

Widow Pension Fraud : महिलेचा अजब कारनामा ! पतीकडून वसूल करतेय पोटगी अन् शासनाकडून विधवा पेन्शन, नेमकं प्रकरण काय?

Emotional HSC Exam Story : आईचा मृतदेह घरात असताना मुलीने दिला बारावीचा पेपर; मन सुन्न करणाऱ्या घटनेने गावकरी हेलावले

RERA : ‘रेरा’ बंद करण्यासही आमचा आक्षेप नाही; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT