fried gawar sakal
लाइफस्टाइल

Fried Gawar Recipe: स्नॅकटाईमच्या वेळी कुरकुरीत अन् चटपटीत गवारीचा आस्वाद घ्या, पाहा सोपी रेसिपी

भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, त्यांचे नियमित सेवन केल्याने अनेक समस्या दूर होतात.

Aishwarya Musale

भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, त्यांचे नियमित सेवन केल्याने अनेक समस्या दूर होतात. या यादीत गवारचे चे नाव देखील येते, ज्याला क्लस्टर बीन्स असेही म्हणतात.

गवारीची जास्त करून भाजी केली जाते. पण तुम्ही कधी कुरकुरीत गवार खाल्ली आहे का? नसेल तर एकदा नक्की खाऊन बघा... त्याची चव तुमच्या घरातील सर्वांना आवडेल अशी आहे. आम्ही तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहोत.

लागणारे साहित्य

गवार - 400 ग्रॅम

कांदा - 1 (चिरलेला)

टोमॅटो - १ (चिरलेला)

चाट मसाला- 1 टीस्पून

मीठ - चवीनुसार

लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

तेल - तळण्यासाठी

बनवण्याची पद्धत

सर्व प्रथम एका भांड्यात गवार काढून स्वच्छ करा. नंतर गवार पाण्याच्या साहाय्याने नीट धुवा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या म्हणजे सर्व पाणी निघून जाईल.

दरम्यान, दुसर्‍या भांड्यात तिखट, मीठ, आंबट, चाट मसाला वगैरे घालून मिक्स करा. नंतर कढईत तेल गरम करायला ठेवा.

तेल गरम झाल्यावर गवार एक एक करून तळून घ्या. कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करा.

आता तयार मसाला व चिरलेला टोमॅटो व कांदा घालून गरमागरम चहाबरोबर सर्व्ह करा. तुम्ही हे स्टोर करून देखील ठेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT