Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : घनदाट आणि मजबूत केस हवेत? मग, हेअर केअर रूटीनमध्ये ‘या’ हेल्दी सवयींचा करा समावेश

Hair Care Tips : उन्हाळ्यात केसांशी निगडीत समस्या निर्माण होणे, ही खरं तर एक सामान्य बाब आहे. कडक सूर्यप्रकाशाचा आपल्या केसांवर आणि त्वचेवर अतिशय वाईट परिणाम होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : उन्हाळ्यात केसांशी निगडीत समस्या निर्माण होणे, ही खरं तर एक सामान्य बाब आहे. उन्हाळ्यातील कडक सूर्यप्रकाशाचा आपल्या केसांवर आणि त्वचेवर अतिशय वाईट परिणाम होतो. केस गळणे, केस तुटणे, केस कोरडे होणे इत्यादी अनेक केसांच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून सुटका करण्यासाठी मग, अनेक उपाय केले जातात.

मात्र, प्रत्येक वेळी घरगुती उपाय किंवा केमिकल्सने युक्त असलेल्या प्रॉडक्ट्सचा वापर करून ही केसांच्या समस्या दूर होईलच असे ही नाही. त्यामुळे, या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये काही हेल्दी सवयींचा समावेश करणे, गरजेचे आहे.

या हेल्दी हेअर केअर रूटीनमुळे तुमचे केस घनदाट आणि मजबूत होऊ शकतात. कोणत्या आहेत या हेल्दी सवयी? चला तर मग जाणून घेऊयात.

संतुलित आहार घ्या

आरोग्य आणि केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही संतुलित आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे. संतुलित आहार घेतल्याने केसांचे योग्य पोषण होते आणि केस निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे, या संतुलित आहारामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, मोड आलेली कडधान्ये आणि इतर मल्टिव्हिटॅमिन्सचा समावेश करू शकता. यामुळे, तुमच्या केसांची योग्य प्रकारे वाढ होऊ शकेल.

केसांना तेल लावा

केसांना तेल लावणे, हा केसांची देखभाल योग्य प्रकारे करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. हेअर केअर रूटीनमध्ये केसांसाठी हा अतिशय महत्वाचा भाग आहे. शक्यतो कोमट तेलाने नियमितपणे केसांची आणि टाळूची मालिश करा. केसांची मालिश केल्यानंतर ४०-४५ मिनिटांनी केस हर्बल शॅंम्पूने ध्वा. यामुळे, केसगळतीची समस्या आणि केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या कमी होऊ शकते.

केसांचे कंडिशनिंग करा

केस शॅंम्पूने धुणे आणि केसांना तेल लावणे हे जितके महत्वाचे आहे, तितकेच महत्वाचे केसांचे कंडिशनिंग करणे आहे. केस शॅंम्पूने धुतल्यानंतर केसांना चांगल्या प्रतीचे कंडिशनर लावायला विसरू नका. केसांना कंडिशनर लावल्यानंतर १०-१५ मिनिटांनी केस धुवा. यामुळे, केस तुटण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT